बोगस आयकार्ड प्रकरणी नगरसेवकाच्या संस्थेला पुणे मनपाने मागितला खुलासा,

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offerlow-cost-news-portal-design-4999-rsgolden night sex power supliment
Advertisement

(Fake idCard case) काही महाभागाने बोगस आयकार्ड बनविल्याचे सजग नागरिक टाईम्सने उघडकीस आणले होते.

(Fake idCard case) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे :

कोरोनाने मृत्यूमुखी झालेल्या लोकांचे अंत्यविधीसाठी पुणे महानगर पालिकेने पुण्यातील काही सामाजिक संस्थाची निवड केली आहे.

त्यातील एक संस्था कोंढव्यातील नगरसेवकाची असून त्या संस्थेच्या नावाने व पुणे महानगर पालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ कल्पना बळीवंत

यांच्या सहीचा गैरवापर करून कलर आयकार्ड बनवून त्याचा गैरवापर केला जात असल्याचे सजग नागरिक टाईम्सने २० मे रोजी उजेडात आणले होते.

Advertisement

वाचा : लॉकडाऊनच्या काळात पोलीसांनी धरू नये म्हणून बोगस आयकार्ड बनविण्याचा प्रकार.!

त्याची दखल घेत पुणे महानगर पालिकेतील आरोग्य अधिकारी डॉ. अषिश भारती व डॉ. कल्पना बळीवंत यांनी

त्या संस्थेला दोन दिवसात आयकार्ड संदर्भात आरोग्य विभागाकडे खुलासा सादर करण्यास पत्र व्यवहार केले आहे.

revealed-to-the-corporators-organization-in-the-fake-idcard-case

वाचा : “एक हात मदतीचा” गरजू लोकांना जेवणाची व्यवस्था

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement

ज्याने बोगस आयकार्ड बनविण्याचा प्रकार केला आहे तो खरंच चुकिचा आहे.

या संदर्भात एका सामाजिक कार्यकर्त्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की

नगरसेवकाची संस्था असल्याने पुणे महानगर पालिका कारवाई करणार नाही फक्त कागदी घोडे नाचविले जाणार.

काही गैरप्रवृत्तीमुळे इमानदारीने काम करणाऱ्या लोकांकडे / संस्थांकडे पण संशयाने पाहिले जाते.

Advertisement

एखाद्या सर्व सामान्य नागरिकाची संस्था असती तर आतापर्यंत पुणे महानगर पालिकेने ४२० चा गुन्हा दाखल केला असता,

परंतु ही संस्था एका नगरसेवकाची असल्याने पुणे महानगरपालिका ठोस कारवाई करणार का ? असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे.

वाचा : कुख्यात गुंड माधव वाघाटे अंत्ययात्रेची रॅली प्रकरणी २ पोलीस निरीक्षकांची उचल बांगडी.

Advertisement
Share Now

2 thoughts on “बोगस आयकार्ड प्रकरणी नगरसेवकाच्या संस्थेला पुणे मनपाने मागितला खुलासा,

Comments are closed.