ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

श्रीराम चौक परिसरात रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते

Advertisement

shriram chowk hadapsar :लवकरात लवकर खड्डे बुजवीले नाहीतर अझरुद्दीन सय्यद यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

Roads in the shriram chowk hadapsar area

shriram chowk hadapsar : सजग नागरिक टाइम्स : प्रभाग क्रमांक २६ मधील श्रीराम चौक हंडेवाडी रोड येथील राॅयल कॅफे समोरील रस्त्यांवर जागोजागी खड्डे पडले आहेत.

दोन्ही बाजु ने रस्त्यावर खड्डे पडल्याने दररोज कित्येक छोटे मोठे अपघात घडत आहे.

संपूर्ण रस्ताच खड्ड्यांनी व्यापलेला असल्याने अनेक गाड्या या खड्ड्यांत अडकून पडतात.

पाऊस पडल्यावर या खड्ड्यात मोठ्याप्रमाणात पाणीचा साठा होत असून नागरिकांना याच पाण्यातून वाट काढावी लागते.

Advertisement
video paha

परिसरात पाणी साचल्याने दुर्गंधी पसरलेली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक, सामान्य नागरिक, महिलांना नाहक त्रास होत आहे.

हा रास्ता हडपसर हंडेवाडी ला जोडणारा मुख्य रस्ता आहे, रस्त्याची अवस्था बिकट झालेली आहे.

या संबंधी दोन वेळा महानगरपालिकेला तक्रार करण्यात आली परंतु या विषयी प्रशासन जाणून बुजून दुर्लक्ष करत आहे.

लवकरात लवकर श्रीराम चौक परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवून सदरील रस्त्याचे काम करावे

अशी मागणी मनसे चे युवा नेते अझरुद्दीन सय्यद यांनी सहाय्यक आयुक्त हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय यांना निवेदनाद्वारे केली आहे ,

अन्यथा आंदोलन करण्यात येईल असा इशारा ही देण्यात आला आहे.

तिकिटांचा काळाबाजार.१० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प १४ रुपयाला

Share Now

One thought on “श्रीराम चौक परिसरात रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ते

Comments are closed.