ताज्या घडामोडी

रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

Advertisement

भारिपच्या कार्यकर्त्यांची रत्नाकर गायकवाड यांना मारहाण

औरंगाबाद – राज्याचे माजी माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांना औरंगाबाद येथे भारिप-बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी अमानुषपणे मारहाण केली आहे.

औरंगाबादमधील सुभेदारी या शासकीय गेस्ट हाऊसमध्ये आज दुपारी गायकवाडांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांच्या कार्यकर्त्यांनी रत्नाकर गायकवाड यांना मारहाण केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मारहाणीत गायकवाडांच्या छातीला दुखापत झाल्याचीही माहिती आहे. मुंबईतीलदादर इथले आंबेडकर भवन पाडकामाच्या रागातून रत्नाकर

गायकवाड यांना मारहाण केली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे. गायकवाड यांना मारहाण करीत असताना पत्नी सोडवण्यासाठी मध्ये गेली असता त्यांनाही मारहाण झाली आहे. याप्रकरणी बेगमपुरा पोलिसांनी दोन महिला आणि चार पुरुष कार्यकर्त्यांना अटक केली आहे. गायकवाडांना संतापातून मारहाण करण्यात आल्याचं वक्तव्य आनंदराज आंबेडकरांनी केलं आहे. तर प्रकाश आंबेडकरांनी या मारहाणीच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. रत्नाकर गायकवाड यांच्यावर अमित भुईगड, श्रीरंग ससाणे, शांताबाई धुळे, दिनेश साळवे, गौतम गवळी, रेखाबाई उजागरे यांनी हल्ला केला असून, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Advertisement

तत्पूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेले आणि त्यांच्या चळवळीचे केंद्र राहिलेले आंबेडकर भवन आणि बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस, मुंबई 25 जून 2016 रोजी रात्री 2 वाजता रत्नाकर गायकवाड आणि त्यांच्या साथीदारांनी पाडली होती. त्यानंतर रत्नाकर गायकवाडांविरोधात बौद्ध अनुयायांचा संताप उफाळून आला होता. त्यांना त्वरित अटक करावी, अशी मागणी करणारे निवेदन सत्यशोधक समाज जिल्हा चंद्रपूरतर्फे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्यात आले होते. सरकार एकीकडे कोटी रुपये खर्च करून डॉ. आंबेडकरांच्या संबंधित वास्तू आणि ठिकाणाची स्मारके बनवित असताना त्यांनी ज्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस आणि आंबेडकर भवनमधून बहुजनांसाठी ऐतिहासिक चळवळ चालविली. तीन- तीन वृत्तपत्रे काढली, ती वास्तूच रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारानी जमीनदोस्त केली. त्यामुळे देशातील करोडो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकतो, असा इशारा सत्यशोधक समाजाने दिला आहे. सरकार एकीकडे करोडो रुपये खर्च करुन डॉ. आंबेडकरांच्या संबंधित वास्तू आणि ठिकाणाची स्मारके बनवित असताना त्यांनी ज्या बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेस व आंबेडकर भवनमधून बहुजनांसाठी ऐतिहासिक चळवळ चालविली. तीन- तीन वृत्तपत्रे काढली, ती वास्तूच रत्नाकर गायकवाड व त्यांच्या साथीदारानी जमीनदोस्त केली. त्यामुळे देशातील करोडो जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. त्यासाठी सरकारने त्यांना त्वरित अटक करावी. अन्यथा राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते, असा इशारा सत्यशोधक समाजाने दिला होता.

गेल्या काही दिवसांपूर्वी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या ऐतिहासिक वास्तूमधून बहुजन समाजाची स्वाभिमानी चळवळ चालविली तसेच बुद्धभूषण प्रिंटिंग प्रेसमधून जनता, प्रबुद्ध भारत, मूकनायक, अशी नियतकालिके काढली, तीच वास्तू उद्ध्वस्त करण्यात आली आहे. त्यामुळे एक प्रकारे हा बाबासाहेबांच्या चळवळीवर चढविलेला हल्ला आहे. हे कृत्य करणाऱ्या रत्नाकर गायकवाड़ व त्यांच्या सहकाऱ्यांना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी करीत सिंधुदुर्गातील आंबेडकरप्रेमी जनतेने 8 जुलै रोजी कणकवली शहरातून प्रांताधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता

Share Now

Leave a Reply