Chetan Tupe :हडपसर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचे नेते उल्हास तुपे यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. तसेच त्यांनी महायुतीचे अधिकृत उमेदवार चेतन विठ्ठल तुपे यांना जाहीर पाठिंबा दीला आहे.
चेतन तुपे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत दिलेल्या पाठिंब्यामुळे नक्कीच चेतन तुपे यांची ताकद वाढली असून त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर करणारी ठरेल,
हडपसर मतदारसंघातील सामाजिक कार्यकर्ते योगेश शीवाजी टिळेकर यांनी हडपसर विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.
यावेळी त्यांनी चेतन तुपे च्या नेतृत्वाला हिरवा कंदील देत पाठिंबा जाहीर केला आहे. टिळेकर यांचा हा निर्णय तुपे साठी अत्यंत महत्वपूर्ण आहे.
चेतन विठ्ठल तुपे यांनी पाठिंबा दिल्याबद्दल उल्हास तुपे योगेश शिवाजी टिळेकर यांचे मनापासून आभार मानले आहे.