ताज्या घडामोडीपुणे

तिकिटांचा काळाबाजार.१० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प १४ रुपयाला

Advertisement

Court fee stamp: पुण्यातील मामलेदार कचेरी बाहेर राजरोसपणे चालतोय स्टॅम्पचा काळाबाजार.

shopkeepers-are-selling-rs-10-court-fee-stamp-for-rs-14

Court fee stamp : सजग नागरिक टाइम्स : पुणे : मामलेदार कचेरीबाहेरील दुकानदार हे कोर्ट फी स्टॅम्प काळ्याबाजाराने विकत असल्याचे अनेक तक्रारी हे सजग नागरिक टाइम्सला आल्या होत्या,

याची खातर जमा करण्यासाठी आमच्या प्रतीनिधीने जाऊन स्टिंगआॅॅप्रेशन केले असता तेथील दुकानदार हे बिनधास्तपणे काळ्याबाजाराने १० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प १४ रुपयाला विकत असल्याचे कॅमे-यात कैद झाले,

व्हिडीओ पहा

आश्चर्याची बाब तर हि आहे की मामलेदार कचेरीला लागूनच खडक पोलीस स्टेशन आहे. जर पोलिसच हतबल झाले असतील तर नागरिकांची लूट होणारच .

Advertisement

मुद्रांक शुल्क विभागाने ठरवून दिलेल्या रकमेतच सदरील तिकिटे विकण्याचे बंधनकारक असताना देखील नागरिकांकडून अतिरिक्त पैसे उकळण्याचे प्रकार चालू आहे.

घरगुती गॅस सिलेंडर विक्रीत एजन्सी चालकांची मनमानी , प्रत्येक ग्राहकांकडून 10 ते 20 रुपये एक्स्ट्रा वसूल

लॉकडाऊन मध्ये नागरिकांनाचे कंबरडे मोडलेले असताना या काळा बाजारामुळे आणखीनच जीव मेटा कुटीला आला आहे.

स्टॅम्प हे फक्त स्टॅम्प वेंडरच विकू शकतात पण मामलेदार कचेरी बाहेर तर बिनदास्त पणे चालतोय हा काळा बाजार .

जर हे दुकानदार स्टॅम्प वेंडर नाही तर यांच्या कडे तिकिटे आली कोठून ? कोण यांना तिकिटे पुरवतोय ?

या लुटारू दुकानदारावर कडक कारवाई होणार का ? व नागरिकांची लूट थांबनार का ?

या काळाबाजारा मागे एखादा रैकेट तर काम करत नाही ना ? याची चोकशी होणे जरुरू असून कडक कारवाई होण्याची मागणी होत आहे .

Share Now

2 thoughts on “तिकिटांचा काळाबाजार.१० रुपयाचे कोर्ट फी स्टॅम्प १४ रुपयाला

Comments are closed.