पुणेब्रेकिंग न्यूज

जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा.

Advertisement

जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून २३ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. गौरी आळीतील पत्र्याच्या शेडमध्ये तसेच मोटारसायकलवर बसून मटका जुगार घेणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे .

sajag nagrik times : पुणे , दि . २१ : – पुणे शहरातील काही पोलिस ठाण्याच्या हद्दीत जुगार अड्डे ,सह अवैध धंदे खुलेआमपणे पाहण्यास मिळत आहे तसेच लॉटरीच्या नावाखाली सोरट , मटका , व तिकडम , विडिओ गेम , वर जुगार घेण्यात येत आहे तर गुरुवार पेठेतील फुलवाला चौकाजवळील गौरी आळीत जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने छापा घातला . त्यात जुगार खेळणारे ८ , खेळविणारे ६ आरोपी ४ आणि पळून गेलेले ५ अशा २३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे . त्यांच्याकडून ४ मोटारसायकलींसह एकूण २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला  आहे . जुगार अड्डा मालक अमोल बाळासाहेब आंदेकर ( वय ४५ , रा . गुरुवार पेठ ) , जुगार अड्डा मालक मनोज ढावरे ( रा . तळजाई माता वसाहत , पद्मावती ) , शकील शेख ( रा . मोमीनपूरा ) ,, रवींद्र रामभाऊ पवार ( वय ५५ , रा . रविवार पेठ ) यांच्यावर ही  गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.

Advertisement

तीन परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस पथकाने सोमवारी रात्री साडेआठ वाजता येथे छापा घातला . त्यावेळी ५ जण पळून गेले . तेथे असणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी अटक केली . त्यांच्याकडून ८ हजार ९२० रुपये रोख , ६० हजार ५०० रुपयांचे १३ मोबाईल , जुगाराचे साहित्य , ४ मोटारसायकल असा २ लाख ७५ हजार ४२० रुपयांचा माल जप्त केला . पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सहआयुक्त संदीप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक , पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया पंधरकर पोलीस हवालदार मोहिते , शिंदे , इरफान पठाण , कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Share Now