सजग नागरिक टाइम्स : प्रतिनिधी : हडपसर भागात अवैध धंद्यांचा सुळसुळाट झाला असून हडपसर पोलिसांच्या आशीर्वादाने राजरोस पणे मटका, जुगार, गांजा,हाथभट्टी ,online लॉटरी, गुटखा विक्री,असे अनेक धंदे चालू असून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने सामाजिक सुरक्षा विभागाला कारवाई करावी लागत आहे.
जर हडपसर पोलिसांनी कारवाई केली तर मूळ मालकांवर न करता पंटरवर कारवाई करून किरकोळ गुन्हे दाखल केले जातात यामुळेच फक्त म्ह्हाडा कॉलोनी ते ससाणे नगर याभागात 20 पेक्षा जास्त अवैध धंदे चालू आहे.
हडपसर पोलिसांच्या डोळ्यावर काळी पट्टी लागल्याने ती पट्टी उतरविण्यासाठी समाजिक सुरक्षा विभागाने धडक कारवाई केली आहे. . मटका जुगार अड्डयावर छापा टाकुन २० जणांवर कारवाई करून १ लाख १ हजार ४१० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे .
हडपसर हद्दीत बेकायदेशीरपणे कल्याण मटका जुगार चालत असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती. सामाजिक सुरक्षा विभाग गुन्हे शाखेकडील अधिकारी व पोलीस अमंलदार यांनी गोपनियरित्या पाळत ठेवुन छापा टाकला असता काही जन बेकायदेशीर कल्याण मटका जुगार पैशांवर खेळत असल्याचे दिसल्याने जुगार घेणारे व जुगार खेळणारे १९ इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन त्यांच्या ताब्यात रोख रक्कम व १५ मोबाईल जप्त केले आहेत .
सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त , पुणे शहर संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त ( गुन्हे ) रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे यांचे आदेश व मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार तसेच अश्विनी पाटील , पोलीस अंमलदार अजय राणे , अण्णा माने , इरफान पठाण , संदिप कोळगे , अमित जमदाडे या पथकाने यशस्वी केली आहे .