ताज्या घडामोडी

समाजवाद संपणार नाही : डॉ अभिजित वैद्य

Advertisement

(Socialism)समाजवाद संपणार नाही : डॉ अभिजित वैद्य

Socialism will not end Dr Abhijit Vaidya

‘लोकनेते भाई वैद्य कृतज्ञता पुरस्कार एड . संतोष म्हस्के यांना  प्रदान 

सजग नागरिक टाइम्स : पुणे :’जग हे भांडवलशाही आणि उजवीकडे घरंगळत आहे ,(Socialism) समाजवाद संपत चालला आहे ,असे बोलले जात आहे .

 मात्र , जोपर्यंत समाजात विषमता आणि असमानता आहे तोपर्यंत समाजवाद संपणार नाही,’ असे ठाम प्रतिपादन आरोग्य सेनेचे अध्यक्ष डॉ . अभिजित वैद्य यांनी केले . 

‘ज्ञान फाउंडेशन ‘आयोजित ‘लोकनेते भाई वैद्य कृतज्ञता पुरस्कार’

सामाजिक कार्यकर्ते एड . संतोष म्हस्के यांना डॉ अभिजित वैद्य आणि ज्येष्ठ पत्रकार मल्हार अरणकल्ले  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .

त्यावेळी  डॉ . अभिजित वैद्य  बोलत होते .ज्येष्ठ समाजवादी विचारवंत आणि नेते भाई वैद्य यांच्या ९१  व्या जन्मदिनानिमित्त पूर्व संध्येला हा पुरस्कार सोहळा झाला .

शुक्रवार २१ जून रोजी सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम साहित्य परिषद येथे झाला .डॉ . अभिजित वैद्य म्हणाले ,’भाई वैद्य हे एक विद्यापीठ  होते .

ते कार्यकर्त्यांवर वैचारिक छत्र धरीत आणि लढ्याची तलवार हाती देत असत . एड . संतोष म्हस्के यांनी भाईंच्या विचाराचा गाभा पकडून कष्टकऱ्यांसाठी कार्य केले .

भाई गेले  पण ‘ मरावे परी कार्यकर्त्यांरूपी उरावे ‘ही नवी उक्ती  सिद्ध झाली आहे . सध्या आपण बिकट कालखंडातून जात आहोत .

‘जागतिकीकरणानंतर आर्थिक विषमता वाढेल आणि ती सामाजिक विषमतेला वाढवेल ‘  हा भाईंनी दिलेला इशारा खरा ठरला आहे .

Advertisement

जग भांडवलशाही आणि उजवीकडे घरंगळत आहे ,(Socialism) समाजवाद संपत चालला आहे ,असे बोलले जात आहे .

 मात्र , जोपर्यंत समाजात विषमता आणि असमानता आहे तोपर्यंत समाजवाद संपणार नाही .

सामाजिक ,आर्थिक आघाडीवरील लढाया समाजवादी कार्यकर्ते लढत आणि जिंकत आले .

मात्र ,राजकीय परिवर्तनाची लढाई जिंकणेही भाई वैद्य यांना अभिप्रेत होते .

त्यासाठी भक्कमपणे ,निर्धाराने आणि उपेक्षा वाट्याला आली ,तर ती सहन करीत पुढे गेले पाहिजे . ‘

मल्हार अरणकल्ले म्हणाले ,’भाईंचा प्रवास हा सत्याच्या आग्रहाचा ,ध्यासाचा प्रवास होता .त्यांचे विचार पारदर्शी होते .

श्रोत्यांना विषय उलगडून सांगणे ही त्यांची खासियत होती . व्रतस्थ जीवन जगायचे ठरवून भाईंनी निरनिराळ्या क्षेत्रात काम उभे केले .

भाई वैद्य हे निर्मळ मनाचे ,निर्मळ कामे करणारे निरलस माणूस होते .त्यांनी समाजवादी विचारांचे निर्मळ झरे निर्माण केले . हे झरेच दूषित प्रवाहांना शुद्ध करतील .

‘सत्काराला उत्तर देताना एड . संतोष म्हस्के म्हणाले ,’भाई वैद्य आणि जयवंत मठकर यांनी जीवनाला दिशा दिली .

हे झरेच दूषित प्रवाहांना शुद्ध करतील .’सत्काराला उत्तर देताना एड . संतोष म्हस्के म्हणाले ,’भाई वैद्य आणि जयवंत मठकर यांनी जीवनाला दिशा दिली .

भाईंच्या विचारांचे अनेक पाईक आहेत ,त्यांचा प्रतिनिधी म्हणून हा कृतज्ञता पुरस्कार स्वीकारत आहे.

हा पुरस्कार म्हणजे भाईंचे विचार पुढे नेण्याचा कार्यक्रम आहे .

भाईंच्या विचाराचा गौरव आहे . सातत्य ठेवले तर कष्टकऱ्यांच्या लढाईत यश मिळते ,हा मंत्र भाईंनी कार्यकर्त्यांना दिला . ‘

यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला . मनोहर कोलते . अर्चना मुंद्रा ,सचिन  शिंदे व्यासपीठावर  उपस्थित  होते . 

Share Now

Leave a Reply