श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचं निलंबन:(chhagan bhujbal issue)
नागपूर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी,
श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांचं निलंबन करण्यात आलं.
यासाठी आज विधानसभेत विशेष हक्कभंग मांडण्यात आला. त्याला सर्व पक्षीयांना पाठिंबा दिल्यानंतर, विधानसभा अध्यक्षांनी याबाबतचे आदेश दिले.
हे पण वाचा :ओरिजनल ड्रायव्हिंग लायसन्स आरसी सांभाळत बसण्याची गरज उरणार नाही….
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी हक्कभंग प्रस्ताव मांडला.“महाराष्ट्रातल्या आमदारांची खिल्ली उडवली जाते.
श्रीगोंदाचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी भिमराव नलगे या व्यक्तीच्या घरी जाऊन दारूच्या नशेत धिंगाणा केला. छगन भुजबळ यांच्याबाबत संबंध नसताना शिवीगाळ केली.
सजग च्या विडिओ बातम्या पाहण्यासाठी क्लिक करा
श्रीगोंद्याचे पोलीस उपनिरीक्षक महावीर जाधव यांनी chhagan bhujbal शिवीगाळ केली त्यांना निलंबित करा अधिकाऱ्यांना कडक संदेश गेला पाहिजे.
अधिकारी मुजोर झाले आहेत. ते एकाही आमदाराला विचारत नाहीत”, असं आव्हाड म्हणाले.
महावीर जाधव यांच्याविरोधात आम्ही हक्कभंगाचा प्रस्ताव दाखल करत आहोत तो हक्कभंग समिती पुढे न्यावा, असं आव्हाडांनी नमूद केलं.