ताज्या घडामोडीपुणे

GST विभागातील राज्य कर विक्री अधिकाऱ्यास १ लाखांची लाच घेताना अटक

Advertisement

GST विभागातील राज्य कर विक्री अधिकाऱ्यास १ लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले

State tax sales officer in GST division arrested for accepting bribe of 1 lakh

Pune :व्यापार्‍याची गोठवलेले बँक खाते (सील) पुन्हा चालु करून देण्यासाठी दीड लाख रूपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या वस्तू व सेवा कर विभागाच्या (GST) लाचखोर राज्य विक्रीकर अधिकार्‍यास एक लाखाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने आज सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचून अटक केली.


रामकृष्ण यादवराव माने (रा. बी. टी. कवडे रोड, घोरपडी, पुणे) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, एका व्यापार्‍याने अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली होती.

तक्रारदार व्यापार्‍याच्या बँक खात्यास सील करण्यात आले होते. ते सील काढुन टाकण्यासाठी जीएसटीचे विक्रीकर अधिकारी रामकृष्ण माने यांनी तक्रारदाराकडे दीड लाख रूपयाच्या लाचेची मागणी केली होती.

Advertisement

हेपण वाचा :वर्षाला 1750 रुपये tax भरणा-या इनामदाराला आता भरावे लागणार लाखो रुपये

State tax sales officer in GST division arrested for accepting bribe of 1 lakh
join us

तडजोडीअंती एक लाख रूपयाची लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार व्यापार्‍याची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार केली. प्राप्‍त तक्रारीची खातरजमा करून अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास सापळा रचला.

त्यावेळी सरकारी पंचासमक्ष रामकृष्ण माने यांनी एक लाख रूपये स्विकारले. अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले .

पोलीस अधिक्षक संदीप दिवाण, अप्पर अधीक्षक दिलीप बोरास्ते , उपाधीक्षक सुहास नाडगौडा ,पोलीस निरीक्षक सुरेखा घार्गे ,अर्चना दौंडकर ,पोलीस हवालदार टिळेकर ,पोलीस नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने ही कारवाई केली आहे. जीएसटी विक्रीकर अधिकार्‍यास एक लाख रूपयाची लाच घेताना अटक करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

State tax sales officer in GST division arrested for accepting bribe of 1 lakh
Share Now

Leave a Reply