Homeताज्या घडामोडीशेतजमिनीचा सातबारा नोंद करण्यासाठी,4 हजाराची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

शेतजमिनीचा सातबारा नोंद करण्यासाठी,4 हजाराची लाच घेताना तलाठी अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Sajag Nagrik Times| आजोबांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची सातबारा सदरी नोंद करण्यासाठी 4 हजार रुपये लाच घेताना खेड तालुक्यातील टोकावडे येथील तलाठ्याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. सुजित सुधाकर अमोलिक (वय-50) असे लाच घेताना रंगेहात पकडलेल्या तलाठ्याचे नाव आहे.

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागने ही कारवाई मंगळवारी (दि.7) केली आहे. याबाबत 26 वर्षीय तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि.6) तक्रार दिली. तक्रारदार यांच्या आजोबांनी खरेदी केलेल्या शेतजमिनीची सातबारा सदरी नोंद करण्यासाठी तलाठी सुजित अमोलक यांनी 5 हजार रुपये लाच मागितली.

तडजोडीमध्ये 4 हजार रुपये लाच देण्याचे ठरले होते. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता तलाठी अमोलक यांनी 5 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीमध्ये 4 हजार रुपये लाच स्विकारण्याचे कबूल केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार आज सापळा रचण्यात आला.

तक्रारदार यांच्याकडून 4 हजार रुपये लाच घेताना तालाठी सुजित अमोलक याला रंगेहाथ पकण्यात आले. याबाबत खेड पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे अपर पोलीस अधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे युनिटच्या पथकाने केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्योती पाटील करीत आहेत.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular