News Updatesरमजान स्पेशललेख

पावित्र्याचा परिपाक -रमजान

Advertisement

The culmination of holiness – Ramadan: रमजानुल मुबारक – २

The culmination of holiness - Ramadan

The culmination of holiness – Ramadan : सजग नागरिक टाइम्स : पवित्र रमजान महिन्याचा कालचा पहिला दिवस हा मागील अनेक रमजान महिन्यांपेक्षा वेगळा असा होता .

कोरोना महामारी ने जगाचे सर्व क्षेत्रांचे चित्र बदलून टाकले आहे .त्याचा परिणाम रमजान महिन्यावर ही झालेला आहे . पाच वेळा होणारी अजान आज ऐकू येत नाही .

त्यामुळे सकाळी सहरीच्या वेळेस सुद्धा काही लोकांची धावपळ झाली .

मशिदीमध्ये जाण्यासाठी बंदी असल्यामुळे तरावीहच्या नमाजचा दरवर्षी मिळणारा आनंद काल मिळू शकला नाही . कोरोनामुळे सर्व चित्र बदलून गेले आहे .

रमजान महिन्याबाबत हजरत पैगंबरांनी वेळोवेळी ज्या सूचना केल्या आहेत त्याचे पालन करण्याची जबाबदारी सर्वांची आहे .

रमजान महिना हा एकमेकांची दुःखं जाणून घेऊन मदतीचा हात पुढं करण्याचा महिना आहे . गरजूंच्या गरजा तपासून त्यांना सहकार्य करण्याचा महिना आहे .

सत्कार्याचा प्रोत्साहक – रमजान

E-Business-card

गोरगरीब लोकांना मदत करून त्यांना दैनंदिन जीवनामध्ये सामान्य लोकांप्रमाणे जगता यावे यासाठी समरसता निर्माण करण्याचा महिना आहे.

या महिन्याचे पुण्य किती असावे याबाबत खुद्द अल्लाह तआलाने कुरआन शरीफ मध्ये म्हटले आहे कि रमजान माझा महिना आहे व त्याचे पुण्य मी ठरवणार आहे .

विशेष म्हणजे या जगाला शिकवण देण्यासाठी कुरआन शरीफ हा धर्मग्रंथ या पवित्र महिन्यांमध्ये पृथ्वीतलावर अवतरला आहे .

Advertisement

आज जगामध्ये जे काही घडतंय या सर्व घटनांचे सूतोवाच अल्लाह तआलाने साडे चौदाशे वर्षांपूर्वी हजरत पैगंबरांच्या माध्यमातून कुरआन मार्फत जगापर्यंत पोहोचवले आहे .

म्हणून आपण सर्वांनी या महिन्याचे चांगल्या पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे۔

तरावीह मध्ये इच्छा असूनही अनेकांना हाफिज उपलब्ध नसल्यामुळे कुरआन शरीफच्या तिलावत चा लाभ मिळू शकला नाही .

त्यामुळे अनेक जण वंचित राहिले . परंतु आजचे वातावरण पाहता सर्वांनी सहकार्य भावनेतून या गोष्टी सहन केल्या पाहिजे आणि ते आपण करीत आहोत .

शासनाचे दिले जाणारे निर्देश, उलेमाव मौलानांच्या सूचना यांचे पालन करून या महिन्याचा आपण शुभारंभ केला आहे .

mk-digital-seva
https://mkdigitalseva.com/

पूर्ण महिनाभर याच पद्धतीने आपल्याला कोरोनाशी लढायचं आहे आणि निश्चितपणे कोरोना हरेगा इन्सानियत जितेगी .

म्हणून सर्वांनी होणाऱ्या असुविधांकडे दुर्लक्ष करून भक्तिभावाने रमजान महिन्याचे पालन केले पाहिजे .

हजरत पैगंबरांनी घरामध्ये सुन्नत आणि नफिल नमाज अदा करण्याची शिकवण दिली आहे . यावेळी फर्जसुद्धा घरांमध्ये आदा केली जात आहे .

ही आपल्यासाठी दुसऱ्या अर्थाने एक पर्वणी आहे . सकारात्मक पद्धतीने विचार केल्यास कोरोनामुळे काही चांगल्या बाबी सुद्धा घडल्या आहेत .

त्याचाही अंतर्मुख होऊन विचार करावा आणि रमजानच्या पवित्र पर्वा मध्ये सर्वांनी यथाशक्ती योगदान द्यावे आणि अल्लाहची मर्जी संपादन करावी .

( क्रमशः ) सलीमखान पठाण ९२२६४०८०८२

Lockdown | नागरिकांना Ration मिळावे म्हणुन Mohammadiya Masjid Trust चा पुढाकार

Share Now

10 thoughts on “पावित्र्याचा परिपाक -रमजान

Comments are closed.