सजग नागरिक टाइम्स : Pune: आरोपी दिपक सिताराम मोधे, पोलीस नाईक, हा खडक पोलीस ठाणे, येथे नेमणुकीस असताना मार्च २०२० ते दिनांक ०१/०८/२०२३ रोजी पिडीत फिर्यादीशी ओळख वाढवून,लॉक डाऊनचे कालावधीत घरी जेवण करण्यासाठी येवून फिर्यादीस गुंगीकारक औषध असलेले कोल्डींग पिण्यास दिले यामुळे तिला आलेल्या गुंगीचा फायदा घेवून त्याने फिर्यादीशी शारिरीक संबंध करुन, त्याची चित्रफीत तयार केली.
ती चित्रफित फिर्यादीच्या ओळखीच्या लोकांमध्ये प्रसारित करणेची धमकी देवून तमेच फिर्यादीच्या पतीला जिवे ठार मारण्याची धमकी देवून, वेळोवेळी फिर्यादीरोबर जबरदस्तीने अनैसर्गिक संबंध केला. तसेच फिर्यादीस वेळोवेळी मारहाण करुन, पिस्तुलचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देवून, फिर्यादीच्या घरातील कपाटातील सोन्याचे मणी ,मंगळसूत्र, चांकर, मोन्याची कानातील ४ ते ५ टॉप्स, फॅन्सी रिग्ज, मंगळसूत्रातील मणीवाटी, ब्रेसलेट, नाकातल्या २ चमकी, २ अंगठ्या, वेल, पायातील पैंजण असे अंदाजे एकुण ५ ने ६ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने, लॅपटॉप, डोंगल व वनप्लस मोबाईल या सर्व वस्तु व दागिने जबरीने घेवून गेला.
सदरचाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारी वरुन गुन्हा दाखल करण्यात आलेआहे.
गुन्हा दाखल झाले दिनांकापासून आरोपी हा अटक टाळण्यासाठी फरार झाला होता,
त्याच्यावर दाखल झालेले गंभीर गुन्ह्याची दखल घेवून त्यास पोलीस दलातून निलंबीत केले होते. त्यानंतर तो त्याच्या मुळ पत्यावर अगर मुळ गावी मिळून येत नव्हता. आरोपीने सत्र न्यायालय/उच्च न्यायालय येथे वेळो वेळी केलेले जामीनसाठीचे अर्जास विरोध करण्यासाठी वेळोवेळी सत्र न्यायालय, पुणे व उच्च न्यायालय, मुंबई येथे कागदपत्रासह हजर राहून आरोपीचे विरुध्द असलेले पुरावे न्यायालयात सादर करून आरोपीचे जामीनास प्रखर विरोध केल्याने न्यायालयाने आरोपीचे जामीन अर्ज फेटाळून लावले.
वेळो वेळी न्यायालयात आरोपी हा अटक टाळण्यासाठी फरार झालेला असल्याचे न्यायालयाचे निदर्शनास आणून देवून आरोपीचे अजामीनपात्र वॉरंट प्राप्त करुन आरोपीचा सर्वतोपरी शोध घेतला असता आरोपीची काहीएक माहिती मिळून येत नसल्याने न्यायालयानं आरोपीचा जाहिरनामा प्रसिध्द केला होता.
आरोपीचं जामीनासाठी सर्व मार्ग बंद झाल्याने आरोपी दिपक मोधे हा दिनांक १०/०५/२०२४ रोजी श्री.एन.एच.बारी, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी , शिवाजी नगर पुणे यांच्या न्यायालयात हजर झाला असता मा. न्यायालयाने दिलेले आदेशावरुन आरोपीस खडक पोलीस ठाणे, कडील पोलीस उप-निरीक्षक प्रल्हाद डोंगळे व पोलीस स्टाफने ताब्यात घेवून गुन्ह्याचे तपासी अधिकारी श्रीमती. वैशाली तोटेवार, पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे, पुणे शहर यांचे समक्ष हजर केले. त्यास दाखल गुन्ह्यात अटक करण्यात आली असून त्यास डॉ. जी.आर. डोनालपल्ले, मा.प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो. शिवाजी नगर पुणे यांचे न्यायालयात हजर करुन सरकारी पोलीस अभियोक्ता श्रीमती. शशिकला बोधिनी यांनी मा. न्यायालयात आरोपीची पोलीस कोठडी मिळणेकामी युक्तीवाद करुन त्याची तपासकामी पोलीस कोठडी रिमांड घेतली आहे.
पुढील तपास खडक पोलीस करत आहेत.