ताज्या घडामोडीपुणेब्रेकिंग न्यूज

पुण्यातील रेशनिंग दुकानदार करत आहे धान्याची चोरी

Advertisement

Grain theft : पुण्यातील रेशनिंग दुकानदार करत आहे धान्याची चोरी.. अधिकारी झाले मस्तवाल..!

The ration shopkeeper in Pune is doing it Grain theft

प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ मोफत देण्याचे आदेश असतानाही त्यात हि चोरी.
पुणे जिल्हाधिकारी यांनी लक्ष देण्याची मागणी.
परिमंडळ अधिकारी व पुरवठा निरीक्षकांची चैकशी करा?

Grain theft :सजग नागरिक टाईम्स : पुण्यातील रेशनिंग धान्यातील चोरीचा काळाबाजार काही थांबता थांबेना.

गोरगरिबांच्या धान्याची चोरी होत असताना अधिकारी मात्र मुंग गिळून गप्प बसले आहेत ?

गोरगरीबांच्या तोंडातील घास पळविणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदारा विरोधात कठोर पावले उचलण्यासाठी

शासनाने मोकका अंतर्गत कारवाई करण्यास अंत्यंत गरजेचे असताना शासनाकडून मात्र कारवाई सैल झाल्याने काळाबाजाराचे प्रमाण वाढले आहे.

कामाला दांडी मारणे उपशिक्षकांना पडले भारी 12 जणांना घरचा आहेर..

The ration shopkeeper in Pune is doing it Grain theft

स्वस्त धान्य दुकानदार धान्याची चोरी करत असल्याने ब-याच सामाजिक संस्था,

संघटनांनी आवाज उचलला असता शासनाने ई पाॅस मशिनी आणून धान्याची चोरी रोखण्यासाठी

पाऊल तर उचलले परंतु काही अधिकारी व दुकानदार शासनाच्या हि पुढे दोन पाऊल निघाले.

Advertisement

ई पाॅस मशिनी आणून हि धान्याची चोरी काही थांबेना. असेच प्रकार येरवडा,भवानी पेठ, मार्केट यार्ड,व इतर परिसरात बिनधास्तपणे सुरू आहे.

ई परिमंडळ कार्यालयाच्या अखत्यारित येणा-या येरवडा भागातील एच बी गोयल ई ६७ मेंटल कॉर्नर या दुकानदाराकडे

जु. ई . शेख नावाच्या महिलेच्या नावानी शिधापत्रिका असून त्यामध्ये ७ नावे समाविष्ट असून ई पाॅस मशिनीवर ५ जणांनाच्या नावांची आॅनलाईन नोंद दिसत आहे.

E-Business-card

त्यावर ५ नावे अनुसार १० किलो गहू आणि १५ किलो तांदूळ देणे बंधनकारक असताना सदरील दुकानदार ६ किलो तांदूळ ९ किलो गहू देत असल्याचे शेख यांनी सांगितले,

आणि धान्य घेतल्यावर पावती सुध्दा देत नाही पावतीची मागणी केली तर अरेरावीची भाषा करत असल्याचे सांगितले,

धान्य कमी का देतो विचारणा केल्यावर वरुनच कमी येत आहे असे सांगत असल्याचे हि ते म्हणाले.

आणि शासनाने प्रति व्यक्ती ५ किलो तांदूळ देण्याचे सांगितले असूनही सदरील दुकानदाराने आम्हास २५ किलो ऐवजी १५ किलो तांदूळ देऊन आमच्या हक्कावर गदा आणली आहे.

अश्या मुजोर दुकानदारावर कारवाईची करण्याची मागणी हि त्या महिलेने केली आहे.

यावर पुणे अन्न धान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांनी जातीने लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई करण्याची हि मागणी शेख यांनी केली आहे.

Coronaमुळे मृत्यू झालेल्यांच्या अंत्यविधीसाठी Popular Front of Indiaचा पुढाकार

mk-digital-seva
Share Now