ताज्या घडामोडीपुणे

पुण्यातील वाहतूक पोलिसांकडील पिळवणूक थांबणार,

Advertisement

(Towing vehicles) इतर पेंडिंग दंड भरूनच टोइंग केलेली वाहणे सोडण्याचे आदेशच नाही

(Towing vehicles) नो पार्किंगमधील वाहने उचलून अडवणूक केली जात असल्याचे प्रकरण.

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी : अजहर खान

The traffic police have not been ordered to release the towing vehicles after paying other pending fines

पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी एखादे वाहन धरले की नागरिकांच्या मनात धडकीच भरते.

काही ठिकाणी तर नो पार्किंगमधील वाहने उचलून नेल्याने नागरिकांना वाहन उचलून नेलेल्या ठिकाणी जाण्यासाठी पायपीट करावे लागते.

व ज्या ठिकाणी वाहन उचलून नेले आहे त्या ठिकानी पोहोचल्यावर संबंधित पोलीसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागते हे पुणेकरांना काही नविन नाही.

वाचा : गोवंश हत्याबंदी कायद्याच्या दुरुपयोगाबाबत हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

नो पार्किंगमधील वाहने उचलून नेण्यात आल्यावर वाहतूक पोलीसांकडून टोईंग चार्जेस पेक्षा जास्त रक्कम सांगुन व पहिल्याचे इतर दंड पेंडींग असल्याचे दाखवून पुर्ण पेंडींग दंड भरल्या शिवाय वाहन सोडणारच नसल्याचा पवित्रा वाहतूक पोलिसांकडून घेतला जात आहे.

Advertisement

यामुळे नागरिकांचा संताप अनावर होऊन पोलिसांसोबत हुज्जतबाजीची ही घटना घडल्या आहेत.

तसेच वाहने सोडली जात नसल्याने शेवटी नागरिकांना हात उसने पैसे घेऊन थकीत दंड भरून वाहन सोडवून घेतले जाते.

या सर्व प्रकाराबद्दल सजग नागरिक टाईम्सच्या प्रतिनिधीने पुणे शहर वाहतूक शाखेकडे माहिती घेतली असता धक्कादायक माहिती हाती आली आहे.

एखादे वाहन टोइंगवाल्यांनी उचलून नेले त्या वाहनावर हेल्मेट व इतर दंड पेंडिंग असेल तर पूर्ण दंड भरूनच वाहने सोडली जावे असे कोणतेही आदेश इकडील कार्यालयाकडून काढण्यात आलेले नाही असे लेखी उत्तर वाहतूक शाखेकडून देण्यात आलेत.

मग असे असताना वाहतूक पोलिसांकडून नागरिकांची अडवणूक का केली जाते, यामागचा हेतू काय ?

अश्या प्रकारे अडवणूक करणा-या विरोधात नागरिकांनी तक्रारी करण्यासाठी पुढे आले पाहिजे .

अश्या प्रकाराकडे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त यांनी स्वत: लक्ष घालून दोषी आढळणाऱ्या पोलिसांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

वाचा : पुण्यातील वकिलाच्या खून प्रकरणात नविन वळन,

Share Now