जमीन घोटाळयात अटक झालेल्या महिला अधिकारी अखेर निलंबित.

जमीन घोटाळयात अटक झालेल्या महिला अधिकारी अखेर निलंबित.(suspended)

the-women-officers-arrested-in-the-land-scam-are-finally-suspended/

सजग नागरिक टाईम्स (impact).
गीतांजली गरड यांनी अटकेच्या कालावधी ते निलंबन कालावधी पर्यंत जे रेशनिंग  कार्ड व धान्यांचे परमिटांवर सह्या केल्या आहे ते ग्राह्य धरले जाणार का? असा प्रश्न निर्माण झाला असल्याने अन्न धान्य वितरण अधिकारी स्मिता मोरे यांनी खुलासा करणे गरजेचे आहे,

सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील कोट्यवधी रुपयांची शासकीय जमीनींची बेकायदेशीरपणे हस्तांतरण करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी

पुणे शहर अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या अखत्यारीत येणा-या ह”म” परिमंडल अधिकारी तथा नायब तहसीलदार गीतांजली नामदेवराव गरड(मुळीक)

यांच्या विरोधात 6 फेब्रुवारी 2019 रोजी पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

व पोलीसांकडून अटक करण्यात आली होती व न्यायालयाकडून पोलीस कस्टडी देण्यात आली होती,

गरड ह्या  जामीनावर सुटताच काहि दिवसांनी लगेच ह”म“परिमंडल कार्यालयात थेट रूजू झाले होते,

याची माहिती सजग नागरिक टाईम्स च्या प्रतिनिधींना मिळाली

त्याची खातर जमा केली असता गीतांजली गरड हे सदरील कार्यालयात शासकीय कामकाज व रेशनिंग कार्डाचे काम करत असल्याचे दिसून आले ,

the-women-officers-arrested-in-the-land-scam-are-finally-suspended/
सजग नागरिक टाईम्स ने प्रसिद्ध केलेली बातमी

त्या बाबतीत अधिक माहिती घेऊन सजग नागरिक टाईम्स ने 7 मार्च रोजी

ह”म” परिमंडल कार्यालयातील अधिकारी 48 तासापेक्षा जास्त पोलीस कोठडीत असताना

कार्यभार काढायचा वरिष्ठांना पडला विसर ! या शिर्षकाखाली बातमी प्रसिद्ध केली होती,आणि पाठपुरावा सुरूच होता,

याची दखल घेत वरिष्ठ अधिकारी यांनी तसा अहवाल त्यांच्या वरिष्ठांना पाठविला त्यात ह”म“परिमंडल अधिकारी

तथा नायब तहसीलदार गीतांजली गरड ह्या दोषी आढळल्याने त्यांना अखेर निलंबित (suspended) करण्यात आले आहे.

त्यांच्याकडील कार्यभार काढून ते परिमंडल अधिकारी प्रशांत खताळ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे असे अन्न धान्य वितरण कार्यालयाच्या आदेशात नमूद आहे.

One thought on “जमीन घोटाळयात अटक झालेल्या महिला अधिकारी अखेर निलंबित.

Leave a Reply