(Raping own daughter) पुणे कोंढवा येथील घटना
(Raping own daughter) सजग नागरिक टाइम्स :
अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या 37 वर्षे बापाला न्यायालयाने तीस वर्षे सक्तमजुरी व पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली,
विशेष न्यायाधीश के.के जहागीरदार यांनी हा आदेश दिला.
पोटची मुलगी असलेली अल्पवयीन पीडित तिची आई फितूर झाली असतानाही
वैद्यकीय पुराव्यांवरून मूळचे उत्तर प्रदेश येथील असलेल्या कोंढवा खुर्द भागात राहणाऱ्या आरोपीला न्यायालयाने शिक्षा सुनावली.
जून ते ऑक्टोबर 2019 या चार महिन्यांच्या कालावधीत हा प्रकार घडला .
हेपण वाचा : कोंढव्यातील श्री संत गाडगे महाराज शाळेतील एका शिक्षकाला कोरोना चा संसर्ग,
पीडित मुलगी ही तिच्या कुटुंबीयांसह कोंढवा भागात राहत होती ,ती आठवीत शिकत होती.
घटनेपूर्वी एक वर्षापासून आरोपी पीडित मुलीशी अश्लिल चाळे करायचा ,ते कोणाला सांगू नये यासाठी धमकी देत असे .
त्यानंतरही वेळोवेळी ती एकटी असताना आरोपी तिच्याशी हे कृत्य करत होता . त्रास असह्य झाल्याने 11 ऑगस्ट रोजी तिने आपल्या आईला घडलेला प्रकार सांगितला.
दरम्यान मुलगी गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले. अचानक तिचा गर्भपात झाला.
त्यानंतर 10 ऑक्टोबर 2019 रोजी त्याने आई शेजारी झोपलेल्या पीडितेवर पुन्हा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला,
विरोध केल्याने आरोपीने दोघींना मारहाण केली त्यानंतर दोघींनी जाऊन पोलिसात फिर्याद दिली .
युक्दतीवादादरम्यान विशेष सरकारी वकील अरुंधती ब्राह्मणे म्हणाल्या वडिलांनी पोटच्या मुली सोबत केलेला हा घृणास्पद प्रकार आहे .
या प्रकरणात कमी शिक्षा दिल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल, त्यामुळे अधिकाधिक शिक्षा देण्यात यावी.
त्यानुसार वैद्यकीय पुरावा, तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांची साक्ष आणि प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर पीडितेचा नोंदविला जबाब महत्त्वाचा ठरला.
कंपनीचा बनावट लोगो वापरुन कुकर तयार करणाऱ्या गोडाऊनवर पोलीसांचा छापा,