Homeपुणेकोंढव्यात राजकीय भूकंप! माजी नगरसेवकांच्या निकटवर्तीयाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

कोंढव्यात राजकीय भूकंप! माजी नगरसेवकांच्या निकटवर्तीयाचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुणे महानगरपालिका निवडणुका जाहीर होताच कोंढवा परिसरातील राजकारणाला उधाण आले आहे. कोंढव्याकडे संपूर्ण पुण्याचे लक्ष लागले असतानाच मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. तीन माजी नगरसेवकांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे इम्तियाज शेख यांनी ऐनवेळी साथ सोडत काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

या अचानक झालेल्या पक्षप्रवेशामुळे कोंढवा भागात एकच खळबळ उडाली असून, राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. इम्तियाज शेख यांच्या या निर्णयाचा तीनही माजी नगरसेवकांवर नेमका किती परिणाम होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, इम्तियाज शेख यांनी आगामी निवडणुकीसाठी स्वतंत्र रणनीती आखल्याची चर्चा असून, कोंढवा राजकारणात आणखी मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular