मस्जिदचा चंदा गोरगरिबांना : उमर मस्जिद

UMER MASJID : कोंढवा येथील उमर मस्जिद ट्रस्टने घेतला ऐतिहासिक निर्णय.

UMER MASJID TRUST decided to donate POOR PEOPLE

UMER MASJID : सजग नागरिक टाइम्स : सध्या कोरोनाचे संकट संपूर्ण भारत भर असल्यामुळे अनेक लोकांचे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाले आहे.

व लॉकडॉन मुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. आशा वेळी पुणे कोंढवा उमर मस्जिद ट्रस्टने घेतलेल्या निर्णयाचा समाजात कौतुक होत आहे.

पुणे कोंढवा या भागातील प्रसिद्ध असलेली या मस्जिदचे सर्व ट्रस्टीने निर्णय घेतला की वर्षातून एकदा जे दान मशिदीला दिले जाते

Advertisement

ते दान मस्जिदला न देता आपण राहत असलेल्या शेजार धर्म मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो अशा लोकांना मदत करावी.

सदर मस्जिदीचे 6 ट्रस्टी व एकूण 250 पेक्षा जास्त सभासद आहे.

व त्या सभासदांच्या वर्गणीतुन वर्षाला 3 लाख रुपया पेक्षा जास्त दान या मस्जिदला मिळतो.

Advertisement

अल्लाहच्या मर्जीसाठी दान

मस्जिद मधये नमाज पठण करणाऱ्या मौलाना साहेब जे संपूर्ण वर्ष लोकांची सेवा करतात स्थानिक लोकांनच्या मुलांना कुराण शिकवतात व नमाज पठण करतात.

सदर मस्जिदमध्ये अजाण देणारे मोज्जन साहेब व सफाई कर्मचारी यांच्या साठी ही रक्कम वापरली जाते.

मस्जिदसाठी वर्षभर होणारा खर्च लाईट,पाणी आतील फर्निचर व इत्यादी छोट्या मोठ्या कामाचा खर्च या पैशातूनच केला जातो.

Advertisement

हे सर्व खर्च असताना मस्जिदच्या ट्रस्टींनी निर्णय घेतला आहे की या पवित्र रमजानच्या महिन्यात कोणतीच रक्कम उमर मस्जिद ला न देता

आपल्या शेजारी राहणारे गोरगरीब लोकांना द्यावी, जर तो अडचणीत असेल त्यांच्यावर या लॉकडाऊन मुळे उपासमारीची वेळ आली असेल

किंवा ते परिवार अडचणीत असेल तर तुमचा तो पैसा त्यांच्या कामात येईल.

Advertisement

महत्त्वपूर्ण शब ए कद्र

थोडीफार जे काय मदत तुमच्या माध्यमातून होईल त्याच्यातून त्यांची गरज भागेल

व ते बांधव पण मग तो कोणत्याही जाती घर्मचा असो तो ही तुमच्या सोबत ईद साजरी करू शकेल.

Advertisement

असा ऐतिहासिक निर्णय घेऊन समतेचा व भाईचारा चा संदेश समाजाला देण्याच काम सदर मस्जिदच्या ट्रस्टींनी घेतलेला आहे.

पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत 430 पेक्षा जास्त मस्जिद आहे असा निर्णय जर सर्वसंमतीने सर्व मस्जिदच्या ट्रस्टीने घेतला तर नक्कीच याचा फायदा देशाची ऐकता व अखंडता साबूत ठेवण्यासाठी होईल. स्थानिक भागात राहणारे सर्व जातींचे गोरगरिबांना ही त्याचे फायदे होईल.अंजुम इनामदार
अध्यक्ष मूलनिवासी मुस्लिम मंच

Advertisement
telegram