Homeताज्या घडामोडीमाजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करत गोळीबार

माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला करत गोळीबार

नाना पेठेतील माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या राहत्या घराजवळ गोळीबार झाल्याची प्राथमिक माहितीसमोर आली आहे.

मारेकऱ्यांनी ४ ते ५ राऊंड फायर करत माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे.

वनराज यांच्यावरील हल्ल्यामुळे पुणे शहरात वातावरण बिघडण्याची दाट शक्यता आहे.

वनराज यांच्यावर घरगुती वादातून हा गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे . बंडु आंदेकर यांचे जावई गणेश कोमकर याने फायरिंग केल्याचे समजते.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular