शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी की अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी .
शरद पवार काँग्रेस पार्टीला भाजपा आरएसएसचे 9 उमेदवार चालतात ? पण 5 वर्षा पूर्वी इलेक्शन पुरते भाजपामध्ये प्रवेश घेतलेले पुण्यातील नामचीन मुस्लिम उमेदवार चालत नाही हे कोणते सेक्युलरीजम आहे?
अजित पवार आयुष्यभर सेक्युलर असून भाजपासोबत अलायन्स केल्यामुळे ते जातीयवादी कसे झाले? व चेतन तुपे पाटील हे आयुष्यभर सेक्युलर असून ते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोबत गेले तर ते पण जातीयवादी कसे झाले?
स्वतःला सेक्युलर म्हणणाऱ्या शरद पवार काँग्रेस पार्टीने आरएसएसच्या 9 उमेदवारांना उमेदवारी दिली व फक्त 1 मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी दिली असून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने 6 मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. यात खरा सेक्युलर कोण आहे अजित पवार गट की शरद पवार गट?
अजित पवारांनी अल्पसंख्यानकासाठी अनेक उपक्रम राबविले आहेत ,त्यात मोलवींचे पगार 3 पट केले, मोलाना आझाद निधीमध्ये पण 3 पट वाढ करून 1000 कोटी बजेट केले. कोंढवाभागात विकासासाठी निधी दिला . असे अनेक प्रश्न कोंढव्यातील सामजिक कार्यकर्ते हाजी फिरोज यांनी उपस्थीत केले आहे.