Nizamuddin Merkaj मध्ये घडलेल्या प्रकारापासून स्थानिक अधिकारी व सरकार हाथ झटकण्याचे काम तर करत नाहीना ?
Nizamuddin Merkaj : सजग नागरिक टाइम्स :दिल्ली : निजामुद्दीन मरकजमध्ये अडकून पडलेले 1000 हून जास्त नागरीकाना
कोरोनाचे संशयित असल्याची बातमी अनेक TV चायनलवर प्रसारित केली आहे, यात TV चायनल तर बातम्या ऐवजी देशात विष पसरवीण्याचेच काम करत आहे ,
अश्या TV चायनल विरोधात कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
या TV चायनल वाल्यांनी त्या अडकलेल्या नागरिकांना असे जगासमोर आणले जसे कि ते भारतीय नसून या देशात आतंकवाद पसरवित आहे.
जर या लोकांवर कारवाई होणार असेल तर यापेक्षा मोठी कारवाई दिल्ली सरकार वर होण्याची मागणी नागरिक करत आहे कारण ‘ सरकारचे आदेश होते कि जो जहा है वही रहेंगा ‘यात सामान्य नागरीकाची काय चूक ?
त्यांनी तर आदेशाचे पालनच केले ना ?
अनेक दिवसान पासून निजामुद्दीन मरकजचे विश्वस्त मदत मागत असूनही यांना मदत न करणा-या अधिकारी व मंत्रीवर हि कारवाई होणार का ?
उगाचच मुस्लीम द्वेष मनात ठेऊन बातम्या पसरविण्याचे काही लोकं काम करत आहे अश्या धर्मांध लोकांवरही कारवाई होण्याची गरज आहे.
नीजामुद्दिन तब्लीगी जमात कडून काय सांगितले गेले आहे ते पाहूया
जेव्हा ‘जनता कर्फ्यू’ जाहीर झाला, तेव्हा बर्याच लोक त्या वेळी मरकजमध्ये होते. त्याच दिवशी मरकजबंद करण्यात आला होता.
कोणालाही बाहेरून येण्याची परवानगी नव्हती. मरकज मध्ये राहणा-यांना घरी पाठविण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
२१ मार्चपासून रेल्वे सेवा थांबण्यास सुरवात झाली. त्यामुळे लोकांना बाहेर पाठविणे अवघड होते.
तथापि, दिल्ली आणि आसपासच्या सुमारे 1500 लोकांना घरी पाठवण्यात आले. आता मरकजमध्ये सुमारे 1000 लोक राहीले होते.
जनता कर्फ्यूबरोबरच 22 मार्च ते 31 मार्च दरम्यान दिल्लीत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला.
बस किंवा खासगी वाहने मिळणेही थांबले. देशभरातून लोकांना त्यांच्या घरी पाठविणे कठीण झाले होते.
पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या आदेशाचा विचार करता लोकांना बाहेर पाठवणे योग्य नव्हते. त्यांना मरकजमध्ये ठेवन्याशिवाय पर्याय नव्हता .
24 मार्च रोजी एसएचओ निजामुद्दीन यांनी कलम 144 चे उल्लंघन केल्याचा आरोप करून आम्हाला नोटीस पाठविली.
त्याला उत्तर म्हणून आम्ही सांगितले की मरकज बंद झाले आहे . 1500 लोकांना त्यांच्या घरी पाठविण्यात आले आहे.
आता १००० शिल्लक आहेत जे पाठविणे अवघड आहे. आम्ही असेही सांगितले की आमच्याकडे परदेशी नागरिक देखील आहेत.
यानंतर आम्ही एसडीएमकडे अर्ज केला आणि लोकांना घरी पाठवावं म्हणून 17 गाड्यांसाठी कर्फ्यू पास मागितला.
आम्हाला अद्याप पास देण्यात आलेला नाही. 25 मार्च रोजी तहसीलदार आणि वैद्यकीय पथकाने येऊन लोकांची तपासणी केली.
26 मार्च रोजी आम्हाला एसडीएम कार्यालयात बोलविण्यात आले आणि आम्ही डीएमलाही भेटलो.
अडकलेल्या लोकांची माहिती दिली आणि कर्फ्यू पास विचारला. 27 मार्च रोजी 6 प्रकृती अस्वास्थ्यामुळे 6 जणांना वैद्यकीय तपासणीसाठी घेण्यात आले.
28 March मार्च रोजी एसडीएम आणि डब्ल्यूएचओच्या पथकांनी 33 जणांना तपासणीसाठी घेउन गेले , ज्यांना राजीव गांधी कर्करोग रुग्णालयात ठेवण्यात आले होते.
28 मार्च रोजी एसीपी लाजपत नगर कडून अशी सूचना मिळाली की आम्ही मार्गदर्शक तत्त्वे व कायद्याचे उल्लंघन करीत आहोत. यावर आमच्याकडून दुसर्या दिवशी संपूर्ण उत्तर पाठविण्यात आले.
30 मार्च रोजी अचानक ही बातमी सोशल मिडीयावर पसरली की कोराणामधील रुग्णांना मरकजमध्ये ठेवण्यात आले असून येथे धाड टाकतआहे.
आता मुख्यमंत्र्यांनीही गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. जर त्यांना वास्तव माहित असते तर त्यांनी तसे केले नसते.
लोक प्रधानमंत्र्यांच्या आदेशाप्रमाणे आहे तसेच राहत आहेत याची कल्पना सरकारला लेखी स्वरूपात मरकज ने दिली होती . त्यांना तसेच राहण्यास सांगण्यात आले. लाखो लोकांच्या रस्तोरस्ती झालेल्या गर्दीवर मूग गिळून बसलेला मुस्लिम द्वेषी मीडिया अचानक जागा झाला आणि विष ओकू लागला. आता खरंतर अशा मीडिया वर कारवाई करायची वेळ आली आहे असे भारतीय नागरिकांचे मत आहे .