Homeताज्या घडामोडीहडपसर विधानसभेत चेतन तुपे व प्रशांत जगतापमध्ये होणार का काटे टक्कर ?

हडपसर विधानसभेत चेतन तुपे व प्रशांत जगतापमध्ये होणार का काटे टक्कर ?

काल उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता हडपसर विधानसभेत 51 उमेदवारांनी अर्ज भरला आहे. यातील आधिकांश  उमेदवार हे महाविकास आघाडीतील बंडखोर उमेदवार आहे . तर अजित पवार गटातून चेतन तुपे यांना उमेदवारी मिळाल्याने व तसेच कामाचा व माणसे जोडण्याचा तुपे यांना चांगला अनुभव असल्याने त्यांचे उमेदवारी अर्ज भरताना त्यांच्या सोबत महायुतीचे नेते ,कार्यकर्ते हजारो समर्थक हे मोठ्या प्रमाणात उपस्थतीत होते.

त्यात हडपसर मतदारसंघात दोन दिग्गज आमनेसामने आले आहे. तर तुपेंचा फौजफाटा चांगला असून, त्यात चेतन तुपेंचा चाहता वर्ग जास्त ऍक्टिव्ह असल्याचे दिसून येते आहे. हडपसर मतदारसंघात हडपसर, सय्यद नगर, कोंढवामध्ये चेतन तुपेंची चांगली पकड आहे.

तर चेतन तुपे यांनी केलेल्या विकास कामावर नागरिक खुश असल्याचे बोलले जात आहे. चेतन तुपे यांनी भेटीगाठी सुरू केली असून, जगताप यांच्या समोर बंडखोरांची संख्या जास्त आहे. व काही लोक जगतापवर नाराज असल्याने तुपे यांना संधीचे सोने करणे सोप्पे जाऊ शकते.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular