(work order) ठेकेदाराने वर्क ऑर्डर विना कामे केली का ?
(work order) सजग नागरिक टाईम्स :
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात प्रभाग क्रमांक १८ मध्ये कामांची मुदत संपल्यानंतरही कामे सुरू असल्याचे सजग नागरिक टाईम्सने बातमी प्रसिद्ध करून पाठपुरावा केला होता.
अनागोंदी कारभार बाहेर आल्याने सर्वांच्या खुर्चीवर गदा यायला नको म्हणून काहिजण सजग प्रतिनिधींना वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ करीत होते.
परंतु सजगने दुसरा भाग प्रसिद्ध करताच यंत्रांना खळबळून जागे होत त्या रस्त्याच्या कामकाजा संदर्भात स्पष्टीकरण द्यायला लागले .
वाचा : उपायुक्तांचे आदेश धाब्यावर बसवत भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून कामे सुरूच !
प्रभाग क्रमांक १८ मधील बोंबील मार्केट, सुभेदार तालीम चौक ते पंचमुखी मारुती मंदिर ते पानघंटी चौक (शितलादेवी चौक),
बंदीवान मारुती मंदिर ते फुलवाला चौक, बॅंक ऑफ महाराष्ट्र ते कस्तुरी चौक,
खडकमाळआळी येथील चर्च ते अशोक बेकरी रस्ता, ७ नंबर कॉलनी ते कर्मशाळा पर्यंत,
व इतर ठिकाणी रातोरात डांबरीकरणाचे कामे करण्यात आली आहे.
सदरील कामे हे भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे यांच्या अखत्यारीतील आहे.
सदरील ठिकाणी करण्यात आलेल्या डांबरीकरणाच्या कामांची वर्क ऑर्डर झालीच नसल्याने कामे कशी काय करण्यात आली ?
वर्क ऑर्डरच नसताना त्या ठेकेदाराने स्वताच्या खिशातील पैसे लावून काम का केले ?
तो ठेकेदार खुप मोठ्ठा समाजसेवक असावा ? अश्या समाजसेवक ठेकेदाराने सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीत मोफत रेमडिसिवर इंजेक्शन नागरिकांना पुरवून समाजसेवा करावी असे मत काही नागरिकांनी व्यक्त केले आहेत.
भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात अनेक कामे वर्क ऑर्डर विनाच केली जात असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांनी दिली.
वाचा : कामाची मुदत संपल्यानंतरही भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाकडून विविध विकासकामे सुरुच.
तर या संदर्भात कनिष्ठ अभियंता रमेश पाटोळे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की सदरील ठिकाणी केलेल्या कामाची वर्क ऑर्डर १९ मार्चलाच निघाली आहे.
पाटोळे यांना सदरील वर्क ऑर्डर दाखवण्यास सांगितले असता आता दाखवू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले.
वर्क ऑर्डर झाली असेल तर दाखवायला काय हरकत आहे.
या संदर्भात भवानी पेठ क्षेत्रीय अधिकारी सचिन तामखेडे व उप अभियंता बाळासाहेब टुले यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही.
वर्क ऑर्डर विना कामे करणा-या कनिष्ठ अभियंताची सर्व कामांची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
पुढील बातमीत : भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील कामांचा पंचनामा.
वाचा : पुण्यात खळबळजनक प्रकार; गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षकावर विनयभंगाचा गुन्हा दाखल,