पुणे : हडपसर येथील आरोपी टिपू ऊर्फ रिजवान पठाण याने पोलिसांवर गंभीर आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात ‘रिट’ याचिका दाखल केली आहे. पोलिसांनी विनाकारण अटक केल्याचा आरोप करत त्याने न्यायालयात धाव घेतली आहे. यावर न्यायालयाने १० जून रोजी सुनावणी ठेवली आहे.
टिपू ऊर्फ रिजवान पठाण, ऍड.बिलाल शेख आणि ऍड. करन राजपूत यांनी मिळून याचिका दाखल केली असून, २ एप्रिल रोजी अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून, सध्या येरवडा कारागृहात ठेवण्यात आले आहे.