सजग नागरिक टाइम्स प्रतिनिधी:
पुण्यातील भवानी पेठ परिसरात 28 जानेवारी रोजी घडलेल्या खून प्रकरणातील आरोपी मनोज कांबळे याला जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात आरोपीच्या वतीने अॅड. रिजवान अहमद, अॅड. वरुना गाडे, अॅड. तौफिक शेख, अॅड. मोसिम शेख, अॅड. ऋतुजा जगदाळे आणि अॅड. नौशाद फर्निचरवाला यांनी बाजू मांडली.न्यायालयात सादर करण्यात आलेले पुरावे हे प्रामुख्याने परिस्थितीजन्य स्वरूपाचे असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच तपास पूर्ण झाल्यामुळे आरोपीला पुढील काळासाठी कोठडीत ठेवण्याची आवश्यकता नसल्याचे बचाव पक्षाकडून सांगण्यात आले.दरम्यान, या प्रकरणी खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
खून प्रकरणात आरोपीला जामीन मंजूर
RELATED ARTICLES



