Homeताज्या घडामोडीटिपू पठाण व त्याच्या टोळीवर पुन्हा मोक्का 

टिपू पठाण व त्याच्या टोळीवर पुन्हा मोक्का 

परिमंडळ ५ अंतर्गत काळेपडळ पोलीस ठाणे अभिलेखावरील सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू पठाण व त्याच्या टोळीवर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली.

सय्यदनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेने काळेपडळ पोलीस ठाणे येथे येवून टिपु पठाण, व त्यांचा भाऊ इजाज पठाण त्यांचेसोबत ०७ ते ०८ साथीदारा विरुद्ध काळेपडल पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. गुन्हा क्र. १००/२०२५ भा.न्या.सं. कलम ३०८ (२), ३२९ (३),३५१ (२), ३५२,१८९(१),१८९(२),१९१ (२),६१ (२),१११ प्रमाणे गुन्हा नोंद आहे. नमूद गुन्हयातील

आरोपी क्र. १) रिजवान ऊर्फ टिपू सत्तार पठाण (टोळीप्रमुख), वय ३४ वर्षे, रा. विल्डींग ख्वाजा मंजिल, गल्ली नं. बी/५, सय्यदनगर, महंदवाडी, पुणे याच्यावर जमीन खाली करण्यासाठी दबावतंत्राचा वापर करणे, खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत व मारामारी अशा प्रकारचे पुणे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सदर आरोपीने त्याचे साथीदार आरोपी क्र. २) इजाज सत्तार पठाण, वय ३९ वर्षे, रा. सदर, ३) नदीम बाबर खान, वय ४१ वर्षे, धंदा व्यवसाय, रा. स.नं. ७५, घर नं. ११४५, गल्ली नं. ए/५, सय्यदनगर, महंदवाडी, पुणे, ४) सद्दाम सलीम पठाण, वय २९ वर्षे, रा. गल्ली नं. २१, सय्यदनगर, हडपसर, पुणे, ५) एजाज युसूफ इनामदार-पटेल, वय ३३ वर्षे, रा. गल्ली नं. १९, सय्यदनगर, हडपसर, पुणे, ६) साजीद झिब्राईल नदाफ, वय २५ वर्षे, रा. वेताळबाबा वसाहत, स.नं. ५. हडपसर, पुणे व ७) इरफान नासीर शेख, वय २६ वर्षे, रा. गल्ली नं. १७, आयशा मस्जीदसमोर, सय्यदनगर, हडपसर, पुणे यांच्यासोबत स्वतःची टोळी तयार करुन स्वतःला तसेच संघटित टोळीला आर्थिक लाभ व्हावा व आजूबाजूच्या परीसरामध्ये आपली दहशत असावी, या उद्देशाने पुणे शहर आयुक्तालय तसेच आजूबाजूच्या जिल्हयांमध्ये गैरकायद्याची मंडळी जमवून अग्निशस्त्र, घातक शस्त्रांसह जबरी चोरी, दरोडा, खंडणी, अवैधरित्या अंमली पदाथांची विक्री करणे ई. गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले असल्याचे निष्पन्न झाल्याने नमूद गुन्हयामध्ये महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३ (२), ३ (४) अन्वये कलमवाढ करण्यात आली आहे.

परिमंडळ ५ चे पोलीस उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी गुन्हेगारी नियंत्रणावर भर देऊन शरीराविरुद्धचे व मालमत्तेविरुद्धचे गंभीर गुन्हे करुन जनमानसामध्ये दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगारांच्या हालचालींवर वारकाईने लक्ष ठेवून गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याच्या उद्देशाने कठोर पावले उचलण्याबाबत परिमंडळातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना निर्देश दिलेले आहेत. कुख्यात गुंड व टोळी गुन्हेगार यांचे गुन्हेगारी कारवायांवर वचक बसविण्यासाठी मागील ०४ महिन्यांचे कालावधीमध्ये मोका कायद्यांतर्गत परिमंडळ ५ मध्ये सलग ६ कारवाया करण्यात आलेल्या आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular