Homeताज्या घडामोडीआयडियल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीत 7 विद्यार्थ्यांवर FIR दाखल

आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीत 7 विद्यार्थ्यांवर FIR दाखल

Ideal English School news : आयडियल इंग्लिश स्कूल मध्ये विद्यार्थ्यांला झालेल्या मारहाणीत 7 विद्यार्थ्यांवर FIR दाखल.

FIR filed against 7 students for beating students at Ideal English School news

Ideal English School news : सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी , पुणे : हडपसर सय्यदनगर / गुलामअलीनगर येथील आयडिल एज्युकेशन ट्रस्ट संचालित आयडिल इंग्लिश स्कूल चे प्रकरण पुन्हा एकदा जगासमोर आले आहे.

आयडिल इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याला त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी दि 22 नोव्हेंबर 2019 रोजी जबर मारहाण करून जखमी केले होते.

त्याची सर्वात प्रथम बातमी सजग नागरिक टाईम्स ने प्रसारित केली होती.

त्याची हकीकत अशी कि राशिद सिद्दीकी यांचा मुलगा आयडिल इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण घेत आहे.

वर्गातील सात ते आठ मुलांनी मधल्या सुट्टीच्या काळात या विद्यार्थ्याला जाब विचारत त्याला लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली होती .

तुझे सबकुछ कैसे आता है , ‘ ‘ हर सवाल का जवाब तु क्यूँ देता है , ‘ तुम्हारे कारण टिचर हमे डांटते है . ‘

विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देणाऱ्या या हुशार विद्यार्थ्याला वर्गातील सात ते आठ विद्यार्थ्यांनी खिडकीच्या पडद्याच्या पाइप ने मारहाण केली होती. संबंधित ही सर्व मुले अल्पवयीन आहे.

सदरील शाळेत हे सर्व प्रकार चालू असताना शाळेतील शिक्षक वर्ग व कर्मचारी झोपी गेले होते का ? सदरील शाळेत cctv हे काय नावाला लावले आहे का ? जखमी मुलगा हा बेशुद्धावस्थेत दुपारपासून सायंकाळी ६ पर्यंत वर्गातच होता शाळा प्रशासनाने त्याला दवाखान्यात नेण्याची तसद्दी देखील घेतली नाही ? जर याचे जीव गेले असते तर आम्हाला हुशार मुलास मुकावे लागले असते, शाळा प्रशासन फक्त पैसे कामविण्याचेच काम करत आहे का ? शाळेत नवीन ऍडमिशन देताना विद्यार्थ्यांची आम्ही काळजी घेतो असे पालकांना भासवले जाते , जेव्हा विद्यार्थ्यांनावर असे हल्ले होतात तेव्हा हात झटकण्याचेच काम या शाळेने केल्याचे या प्रकरणातून दिसत आहे.मुलाला मारहाण होत असतानाचे विडिओ आम्ही cctv तिल recording मध्ये पहिले असल्याची कबुली वर्ग शिक्षिकेने दिल्याची रेकॉर्डिंग हि माझ्याकडे आहे , तक्रार शाळा प्रशासनाकडे करून हि पुढे कारवाई न झाल्याने पोलिसात तक्रार दाखल केल्याचे पालक ऍड.राशिद सिद्दीकी यांनी सांगितले.

जर शाळा प्रशासनाने वेळीच हस्तक्षेप केला असता तर हि वेळ आली नसती .

संबंधित विद्यार्थ्याच्या पालकाने या प्रकरणी वानवडी पोलिस स्टेशनमध्ये 27 जानेवारी रोजी तक्रार दिली आहे . पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक अभिजित जोगदंड करीत आहेत .

fir-filed-against-7-students-for-beating-students-at-ideal-english-school-news
ट्रस्टी / प्रिंसिपल च्या कार्यालयात लागलेली cctv footeg
Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular