Police Newsताज्या घडामोडी

तब्बल २१ गुन्हे दाखल असलेला तडीपार गुन्हेगार योगेश पाटणे जेरबंद

Advertisement

पुणे :पेट्रोलींग करीत असताना पोलीस अंमलदार यांना तडीपार असलेला योगेश पाटणे हा पुणे शहरातुन तडीपार असताना सुध्दा कोणता तरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने पुणे येथे आला असुन , तो लाल महल समोर कसबा पेठ , पुणे येथे सार्वजनिक रोडवर उभा आहे अशी बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती.

त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक.संदीप भोसले युनिट -१ यांना माहिती देवून त्यांच्या परवानगीने पोलीस उपनिरीक्षक , संजय गायकवाड व युनिट १ पथकाकडील स्टाफसह बातमीप्रमाणे जावुन नमुद आरोपीस पकडून त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याचे नाव योगेश बाबुराव पाटणे ,( वय – ३२ वर्षे , रा . ४०५/४०६/४०७ कसबा पेठ , दुसरा मजला , प्रगती अपार्टमेंट , पुणे )असे असल्याचे सांगितले व तो स्वतः तडीपार असल्याचे सांगितले .

त्यास पुणे येथे येण्यासाठी कोणाची परवानगी घेतली काय ? याबाबत विचारणा केली असता त्याने कोणाचीही परवानगी घेतली नसल्याचे सांगितले .

Advertisement

त्याचेविरुध्द फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नं . ११४/२०२२ , महाराष्ट्र पोलीस अधिनियम. कलम १४२ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले असून , सदर आरोपीस पुढील कारवाई कामी फरासखाना पोलीस स्टेशन यांचे ताब्यात देण्यात आले आहे .

सदर आरोपीवर खुनाचा प्रयत्न , दरोडयाची तयारी , गंभीर दुखापत , मारामारी , हत्यार बाळगणे , अपहरण , बलात्कार , विनयभंग , तडीपार आदेशाचा भंग असे एकुण २१ गुन्हे पुणे शहरात वेगवेगळया पोलीस स्टेशन येथे दाखल आहेत तसेच सदर आरोपीस सन २०१७ मध्ये सुध्दा दोन वर्षा करीता तडीपार करण्यात आले होते . सदरची उल्लेखनीय कामगिरी ही

पोलीस आयुक्त , पुणे शहर , अमिताभ गुप्ता , पोलीस सह आयुक्त संदिप कर्णिक , अपर पोलीस आयुक्त , गुन्हे रामनाथ पोकळे , पोलीस उप आयुक्त , गुन्हे , श्रीनिवास घाडगे , सहा पो आयुक्त , गुन्हे -१ , गजानन टोम्पे यांचे मार्गदशनाखाली युनिट -१ , गुन्हे शाखा , पुणे शहरचे पोलीस निरीक्षक संदिप भोसले , पोलीस उपनिरीक्षक , संजय गायकवाड पोलीस अंमलदार , अमोल पवार , इम्रान शेख अजय थोरात , अय्याज दड्डीकर , तुषार माळवदकर , महेश बामगुडे , निलेश साबळे यांनी केली आहे .

Share Now