सनाटा प्रतिनिधी ; दि 1 ऑगस्ट 2017 रोजी नविन जिल्हा अधिकारी कार्यालय समोरील बस थांब्या जवळ ज्येष्ठ नागरिकांला मारहाणीचे विडिओ सनाटा प्रतिनिधी अजहर खान यांनी काढून तशी सर्वात प्रथम बातमी हि प्रसिद्ध केली होती .त्याची दखल घेत संबंधित चालक सतिश धोंगडे व वाहक नवनाथ यादव यांची खातेनिहाय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
तर त्या दोघांना नो डयूटी चा आदेश देण्यात आला आहे .या प्रकरणी ज्येष्ठ नागरिक ईरशाद इक्रामुददीन पिरजादे वय 66 वर्ष यांनी बंडगार्डन पोलिसात तक्रार केली आहे .तसेच सनाटा प्रतिनिधीने पाठपुरावा करून संबधीतानवर कडक कारवाई व्हावी अशी मागणी हि पी .एम .पी.एम .पी.चे संचालक तुकाराम मुंडेंना केली होती .त्याची दखल घेत चालक व वाहकाच्या वर्तनाचा अहवाल एस एन चवहाण यांनी महामंडळाकडे सादर केला त्याची गंभीर पणे दखल घेत खायेनिहाय चौकशी चे आदेश देण्यात आले आहे.