News Updatesताज्या घडामोडी

10 व्या फेरी अखेर भाजपाचे मोहोळ 60 हजार 431 मतांनी आघाडीवर

Advertisement

पुणे :  पुणे लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीच्या सहा फेऱ्या पूर्ण झाल्या असून यात भाजपचे मुरलीधार मोहोळ हे सुरुवातीपासून आघाडीवर आहेत. काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर आहेत.

दुस-या फेरीनंतर मुरलीधार मोहोळांना १८ हजारांची आघाडी होती. पुणे मतदारसंघाच्या निकालाकडे  देशाचे लक्ष लागून आहे.

दोन्ही उमेदवारांनी मीच जिंकून येणार असा विश्वास व्यक्त केला होता.  दरम्यान, मुरलीधर मोहोळ हे एकतर्फी निवडून येतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, कॉँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांनी ही निवडणूक चुरशीची केली.

Advertisement

त्यांनी अतिशय जोरदार टक्कर देत मुरलीधर मोहोळ यांचे टेंशन वाढवले होते. त्यामुळे मोहोळ निवडून येणार की धंगेकर बाजी मारणार याबाबत तर्कवितर्क वर्तवले जात होते. दुपारी १२ वाजेपर्यंत भाजपचे मुरलीधर मोहोळ यांनी १ लाख ३४ हजार मतं घेऊन साधारण २४ हजार मतांनी आघाडीवर होते तर रवींद्र धंगेकर यांनी १ लाख १० हजार मतं घेतली होती.  10 व्या फेरी अखेर भाजपाचे मुरलीधर मोहोळ 60 हजार 431 मतांनी आघाडीवर होते.

Share Now