ताज्या घडामोडी

शिंदे सरकारला हायकोर्टाचा दणका,औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावे राहणार!

Advertisement

शिंदे सरकारला आणखी एक धक्का बसला आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांच्या नामांतराचा मुद्दा गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहे.

औरंगबादचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे नाव धाराशिव करण्याचा निर्णय शिंदे सरकारने घेतला होता.

या निर्णयाला प्रखर विरोध झाल्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले. यावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला असून जिल्हा आणि तालुका पातळीवर औरंगाबाद आणि उस्मानाबाद हीच नावे राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Video 🖕

औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामांतराचा निर्णय अलीकडे राज्य सरकारने घेतला होता. परंतु, तालुका आणि जिल्हा पातळीवर कोणताही बदल झाला नाही, अशी भूमिका सरकारने घेतली होती.

दरम्यान, या प्रकरणी सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतला नसल्यामुळे आव्हान देणारी याचिका न्यायालयाने निकाली काढलीआहे.

न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सध्या तरी तालुका आणि जिल्हा पातळीवर नवीन नावे वापरणार नाही, अशी हमी शिंदे सरकारने उच्च न्यायालयात दिली आहे.

Share Now