ताज्या घडामोडी

वानवडी वाहतूक पोलिसांनी जीवावर खेळून जप्त केले हत्यार व वाहन

Advertisement

(TRAFFICE POLICE ARREST) वानवडी वाहतूक पोलिसांनी  जप्त केले हत्यार व वाहन

WANWADI TRAFFICE POLICE ARREST FOUR CRIMINAL

TRAFFICE POLICE ARREST: पुणे वानवडी वाहतूक विभागाच्या समोरील सोलापूर रोडवर

२८जुन रोजी रात्री ८.३५ च्या दरम्यान एम एच १४ जी एल -९८४२ या क्रमांकाच्या बेझ्रा कारने एम एच १२ एन डब्लू ७७६५ या रिक्शाला मागून जोरात धडक दिली.

धडक देऊन  वाहन वेगात पळवून घेऊन गेल्याचे रिक्षा चालकाने सांगितल्याने पोलीस हवालदार लिंगांना ,पोलीस नाईक नाणेकर ,

पोलीस शिपाई कांबळे,पोलीस शिपाई रियाज शेख यांनी दुचाकी  वाहनावर त्या कारचा  पाठलाग करून मम्मादेवी चौकात त्याला अडवण्याचा प्रयत्न केला .

पहा 59 वर्षीय अनंता तील्ली आनंदाने नाचत असताना

परंतु ते काही थांबले नाही म्हणून पुढील टेम्पोला थांबण्यासाठी सांगितले व चोही बाजूने त्याला घेराव टाकून तत्काळ गाडी बंद करून त्यांना खाली उतरण्यास सांगितले.

Advertisement

कार मधील चारही इसमांनी पोलिसांशी वादविवाद करत अंगावर धावून गेले .जवळच कारवाईसाठी उभे असलेले पोलीस हवालदार बोबडे ,

पोलीस हवालदार कुरळे,पोलीस नाईक जाधव,पोलीस शिपाई गायकवाड यांची मदत घेऊन वाहनातील चारही इसमांना ताब्यात घेण्यात आले.

ताब्यात घेतल्यानंतर त्यांची तपासणी घेतली असता नशेत धुंद असल्याचे कळाले व अधिक तपासणी केली असता एका सॅॅक मध्ये एक गावठी कट्टा व एक चोपर असे हतियार मिळाले.

आरोपीचे नाव अक्षय काशिनाथ रासकर वय २६ चारोली पुणे,२)आकाश चंद्रकांत शिंदे वय ३५ रा.शास्त्रीचोक आळंदीरोड भोसरी,

३)पुरुषोत्तम प्रकाशराव शितोळे वय  ३५ रा.लोहगाव साठेनगर पुणे ४) बिरू रामभाऊ फास्के बी ३५ रा.शास्त्रीचोक आळंदीरोड भोसरी पुणे.

यासर्वांना पुढील कारवाईसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक वानवडी यांच्या ताब्यात देण्यात आले असल्याची माहिती मिळाली .

Share Now

3 thoughts on “वानवडी वाहतूक पोलिसांनी जीवावर खेळून जप्त केले हत्यार व वाहन

Leave a Reply