ताज्या घडामोडीपुणे

रेशन धान्य मिळत नसल्याने विभागीय आयुक्त कार्यालयावर हजारो महिलांचा मोर्चा.

Advertisement

(Ration grains) रेशन धान्याचा काळाबाजार करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशीकरण्याची मागणी हि लोक जनशक्ती पार्टीने केली आहे.

not getting ration grains Thousands of women marched for Divisional Commissioner office

(Ration grains) सजग नागरिक टाइम्स.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत केंद्रसरकार कडून आलेल्या मोफत धान्न्याचा काळा बाजार करणाऱ्या अन्नधान्य वितरण अधिकारी,

पुणे शहर व पुणे जिल्हा तालुका पुरवठा अधिकारी , शहरातील सर्व परीमंडळ अधिकारी ,

सर्व रेशनिंग दुकानदार यांची न्यायालयीन समिती नेमुन चौकशी करून दोषी वर  कारवाई करण्यात यावी,

अशी मागणी लोकजनशक्ती पार्टीने आज पुण्यात केली.

पुणे  विभागीय आयुक्त कार्यालयावर  हजारो महिलांचा  संघर्ष मोर्चा आज लोकजनशक्ती पार्टीने काढला . 

लोकजनशक्ती पार्टीचे साधू वासवानी चौकातील कार्यालय ते विभागीय आयुक्त कार्यालय असा हा संघर्ष मोर्चा लोकजनशक्ती पार्टीचे पुणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय आल्हाट यांच्या नेतृत्वाखाली निघाला .

प्रदेश सरचिटणीस अशोक कांबळे , पुणे शहर जिल्हा  प्रवक्ता के.सी.पवार  ,अंकल सोनवणे ,

उमेश शिंदे,रजिया खान,संजय चव्हाण, अप्पासाहेब पाटील,प्रमोद राजगुरू ,माधव यादव ,

एड. अमित दरेकर,धनंजय धायगुडे ,वैशाली वाघमारे  इत्यादी सहभागी झाले.

वाचा : महाराष्ट्र राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरु करण्याचा विचार : वर्षा गायकवाड

संजय आल्हाट म्हणाले, ‘ पुणे शहर व पुणे जिल्हा अन्नधान्य वितरण अधिकारी व सर्व परीमंडळ अधिकारी यांनी केंद्रसरकारचे संकेत डावलून मोफत धान्य वितरणाचे सेंटर उभे न करता हे काम रेशनिंग दुकानदारावर सोपवून  भ्रष्टाचार केलेला आहे त्याची सी.बी.आय मार्फत चौकशी करण्यात यावी.

सर्व रंगाच्या पांढऱ्या . पिवळया व केशरी शिघापत्रिकेवर असलेली उत्पन्नाची अट रद्द करण्यात यावी.

Advertisement

व त्यांना विकत अथवा मोफत कायमस्वरुपी अन्नधान्याचा कोटा मंजूर करण्यात यावा व त्याचे वाटप करण्यात यावे.

रेशनिंग दुकानदाराने आपल्या विभागातील शिधापत्रिका धारकाची आधार कार्ड ची जोडणी स्वता करुन द्यावी

व थंब ( अंगठा )जरी आधार कार्डला जोडला गेला नाही तरी शिधापत्रिकेला प्रमाण माणून त्यास धान्य देण्यात यावे

पुणे शहर व पुणे जिल्हयातील सर्व दुकानदारांनी मोफत आलेल्या अन्नधान्याचा साठा ज्या शिधापत्रिके धारकांना व आधार कार्ड असणा-या मजुरांना व ज्यांच्याकडे शिधापत्रिका व आधार कार्ड नाही त्यांचा मोबाईल नंबरवर व मोबाईल नसेल तर त्याच्या फोटोवर जे धान्य वाटप केलेले आहे.

वाचा : हडपसर पोलीस स्टेशनला दबंग अधिकारी बाळकृष्ण कदम यांचे आगमन,

त्याची यादी जाहीर करून त्याची एक प्रत आम्हास देण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे  करण्यात आली.

 पुणे शहरातील ज्या गोरगरिब नागरिकांना ज्यांची शिधापत्रिका असताना सुद्धा व त्यांना परिस्थिती माहित असताना धान्य वितरण केले नाही,

त्या सर्व दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात यावे. व त्याच बरोबर संबंधित सर्व परिमंडळ अधिकारी व सर्व रेशनिंग इनिस्पेक्टर ,

तालुका पुरवठा अधिकारी , जिल्हा पुरवठा अधिकारी व शहर पुरवठा अधिकारी यांच्या वर कायदेशिर कारवाई करण्यात यावी.

सदरहू मोफत अन्नधान्य वाटपाचा पहिल्या टप्प्यातील तकारी आजच्या लोक जनशक्ती पार्टी संघर्ष मोर्चाच्या वतीने सर्व तक्रारदारासह पुरवठा विभाग उपायुक्त डॉ त्रिगुण कुलकर्णी यांना सादर करण्यात आले .

जर याप्रकरणी प्रशासनाने या बाबी गांभिर्यपुर्वक जर दखल घेतली नाही.

तर लोक जनशक्ती पार्टी च्या वतीने मुंबई येथे मंत्रालयावर जन आंदोलन करण्यात येईल व त्यातूनही जर सरकारने न्याय दिला नाही तर संसद भवना समोर निदर्शनेवर करण्यात येतील .

पंतप्रधानाला या संपूर्ण प्रकरणाचे सविस्तर निवेदन सादर करण्यात येतील या सर्व गोष्टीस आपण जबाबदार असाल याची गांभिर्याने दखल घेण्यात यावीअसे यावेळी सांगण्यात आले.

            

Share Now