Aditya Thackeray: पुण्यातील बिहारी कुटुंबाने आदित्य ठाकरेंना केला फोन, पोलिसाने पोहचवली मदत
Aditya Thackeray : सजग नागरिक टाईम्स : पुणे : हडपसर मोहम्मद वाडीतील कृष्णा नगर येथील एका बिहारी कुटुंबाच्या मदतीला धावले महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे व पुणे पोलीस.
मोहम्मद वाडी मधील या बिहारी कुटुंबातील महिलेने महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना फोन करून मदत मागितली.
त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून युवतीसेना पुणे जिल्हा समन्वयक मनिषा धारणे यांना सदर कुटुंबाला त्वरित मदत करण्याचे सांगितले होते,
मनिषा धारणे यांनी त्या कुटुंबाशी संपर्क साधला असता ४ लहान मुलं व नवराबायको असं बिहारी कुटुंब राहत असल्याची माहिती मिळाली ,
दोनच महिन्यापूर्वी ते कुटुंब पुण्यात आलं होतं त्यामुळे त्यांच्या कडील पैसे देखील संपले होते आणि परिसराची नीट माहिती देखील नव्हती,
गेल्या दोन दिवसापासून त्यांच्या मुलांना पोटभर जेवण देखील मिळालं नाही हे सांगताना त्या महिला खूप तळमळत होत्या.
मदत नव्हे कर्तव्य म्हणून ३५० राशनकिट वाटप
आणि सध्याची परिस्थिती बघता मनिषा धारणे यांना तेथे मदत घेऊन जाणं हि अशक्य होतं,
मनिषा धारणे यांनी पूर्वी वानवडी पो.स्टेशन ला असलेले पोलीस निरीक्षक( गुन्हे ) मच्छिंद्र पंडित यांच्याशी संपर्क साधला.
मच्छिंद्र पंडित सध्या सायबर गुन्हे शाखा येथे पोलीस निरीक्षक आहेत त्यांना सर्व परिस्थिती सांगितली.
पोलीस निरीक्षकाने रस्त्यावरच केला रोजा इफ्तार
त्यानंतर त्यांनी लगेचच वानवडी पोलीस स्टेशन मधील डिबी पथकातील नासेर देशमुख यांचा नंबर दिला,
मनिषा धारणे यांनी देशमुख यांच्याशी संपर्क साधून सर्व परिस्थिती सांगितली व त्या कुटुंबाला जे जे सामान हवे होते त्याची यादी देशमुख यांना पाठवली.
पुढील काहीवेळेतच म्हणजे एक तासात सदर महिलेच्या घरी त्यांनी सांगितलेले सर्व सामान देशमुख यांनी पोहचवले.
त्याचबरोबर काही आर्थिक मदत देखील दिली. या बिहारी कुटुंबाने मनापासून या सर्वांचे आभार मानले ,
पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडित, सायबर गुन्हे शाखा व वानवडी पोलीस स्टेशन मधील डिबी पथकातील नासेर देशमुख यांच्या रूपाने
आज खाकी वर्दीतील देव माणूस बघायला मिळाला असे उदगार त्या परिवाराने काढले .
फायनान्स कंपण्यांकडुन RBI चे आदेश धाब्यावर ? | Lockdown मध्येही बजाज Financeकडून सक्तिने वसुली सुरू