बदली ऑर्डर निघून हि १० महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्यांवर कारवाई होणार का ?

WEB HOSTING OFFERsajag-advertisement-offer
Advertisement

(Staff transfer order news) शहर अन्न धान्य वितरण कार्यालयातील प्रकार.

(Staff transfer order news) सजग नागरिक टाईम्स प्रतिनिधी :

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे बदलीचे आदेश निघाले असतानाही वरिष्ठांकडून त्यांना सोडण्यात येत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.

बदली संदर्भातील नियमाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे.

शहर अन्न धान्य वितरण कार्यालयात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची बदली न झाल्याने ते परिमंडळ कार्यालयात बसून सोखावले असल्याची चर्चा सध्या अन्नधान्य वितरण कार्यालयात सुरू आहे.

Advertisement

बदली झाली तर ते थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आटापिटा केला जातो.

तर काही जण बदली थांबविण्यासाठी आमदारांचे उंबरठे झिजवत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बदली ऑर्डर निघून ही बदली होत नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.

अन्नधान्य वितरण कार्यालयातील एकुण सहा कर्मचाऱ्यांची ४ ऑगस्ट २०२० रोजी जिल्हाधिकारी कार्यालय महसूल शाखेने बदली ऑर्डर काढली होती.

Advertisement

परंतु त्या बदली ऑर्डरला केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

वाचा : पुण्यातील ३८ रेशनिंग दुकानदारांनी अनामत रक्कम भरली नसल्याचे उघड!

अनिता शिंगारे अव्वल कारकून यांची बदली शिरुर तहसिल कार्यालयात झाली होती.

राजश्री कमलेश भंडारी “ह” परिमंडळ विभाग यांची पुरंदर तहसिल कार्यालयाला बदली करण्यात आली होती.

Advertisement

विनिता कुंभार अव्वल कारकून यांची मावळ तहसिल कार्यालय

Advertisement

तर “क” परिमंडळ विभागातील शितल बरकडे यांची भोर तहसील कार्यालयात ,

उमा बांगर अव्वल कारकून यांची जुन्नर तहसिल कार्यालयात बदली करण्यात आली होती.

परंतु १० महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला तरी अद्यापही बदली झाली नसल्याचे समोर आले आहे.

यातील अनिता शिंगारे व राजश्री भंडारी ह्या कित्येक वर्षांपासून परिमंडळ विभागात व अन्न धान्य वितरण कार्यालयातच ठाण मांडून बसलेले आहेत.

Advertisement

याची बदली होत नसल्याने अन्न धान्य वितरण कार्यालयात बरेच तर्कवितर्क लढवले जात आहेत.

अधिका-यांच्या अडचणीचा फायदा या कर्मचाऱ्यांना होताना दिसत आहे.

जो पर्यंत समोरील कर्मचारी हजर होत नाही तोपर्यंत अन्नधान्य वितरण अधिकारी ह्या कर्मचाऱ्यांना सोडायला तयार नाही.

यामुळे कर्मचारी सोखावले जात आहेत.

Advertisement

परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची अंमलबजावणी ९-१० महिने होत नसल्याचे दिसून येते आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले तर त्या आदेशाची अंमलबजावणी त्वरित झाली पाहिजे.

अंमलबजावणी न होने याची खरीच शोकांतिका आहे. आता जे बदल्या होणार आहेत त्यावेळी यांची बदली होणार का?

फक्त बदली करायची म्हणून बदली करून फक्त कागदे रंगवली जातायेत का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Advertisement

पुणे जिल्हाधिकारी याची दखल घेणार का ? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

याबद्दल अन्न धान्य वितरण अधिकारीशी संपर्क साधला असता तो होउ शकला नाही.

वाचा : हडपसर सय्यदनगर मधीलपेट्रोल पंप लुटणाऱ्या गुन्हेगारांवर मोक्का दाखल,

Advertisement

One thought on “बदली ऑर्डर निघून हि १० महिन्यांपासून ठाण मांडून बसलेल्यांवर कारवाई होणार का ?

Comments are closed.

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल