Homeताज्या घडामोडीपुण्यातील ३८ रेशनिंग दुकानदारांनी अनामत रक्कम भरली नसल्याचे उघड!

पुण्यातील ३८ रेशनिंग दुकानदारांनी अनामत रक्कम भरली नसल्याचे उघड!

(Ration shopkeeper) ५५ लाख ४० हजार २८२ रुपयांच्या वसुलीकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष का ?

(Ration shopkeeper) सजग नागरिक टाईम्स :

पुणे शहरातील रेशनिंग दुकानदारांकडून अनामत रक्कम जप्तीची व धान्य तफावत आलेल्या दुकानदारांकडून गहू आणि तांदळाचे चालू रेटने लाखो रुपयांची वसुली येणे बाकि असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

लाखों रुपयांची वसुली दुकानदारांकडून येणे बाकि असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या लक्षात सदरील बाब का आली नाही ?

याबाबतीत प्रश्न चिन्ह निर्माण झाला आहे.

38 rationing shopkeepers in Pune have not paid their deposits!

दरमहा दुकानदाराना धान्याचे परमिट वितरित करताना अनामत रक्कम जप्त केलेल्या दुकानदारांनी शासकीय कोषागृहात चलन भरली आहे किंवा नाही ?

हे पडताळून पाहण्याचे काम संबंधित परिमंडळ विभागाचे व पुरवठा निरीक्षकांचे असताना ती रक्कम भरून न घेतल्याने २०१८ पासून लाखों रुपयांच्या घरात आकडा गेला आहे.

वाचा : एका किन्नरने लग्न करून मिळविला सुन होण्याचा मान

अनामत रक्कम भरलेली नसताना परिमंडळ विभागाने धान्य साठा मंजूर का केला ?

याचे अधिकाऱ्यांना खरंच माहिती नाही का ? असा प्रश्न पडत आहे.

या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे शासनाचा महसूल बुडत आहे.

यात विशेष म्हणजे २०१८-१९ साली ११ स्वस्त धान्य दुकानदारांवर परवाना रद्दची कारवाई करण्यात आली आहे .

आजतागायत त्या दुकानदारांकडून ४८ लाख ५५ हजार ३९० रुपयांची वसुली झालेली नाही.

उर्वरित काही दुकानदारांकडून अनामत रक्कम जप्तीची व ताकिदची कारवाई केली आहे,

तर त्यांच्याकडून ७ लाखांपेक्षा अधिक रक्कम येणे असल्याची धक्कादायक माहितीही माहिती अधिकारात उघडकीस आली आहे.

चार-चार वर्षे वसुली होत नसल्याने शासनाला तोटा सहन करावा लागत आहे.

तर २०२०-२१ ची यादी अद्ययावत नसल्याचे अन्नधान्य वितरण कार्यालयाकडून सांगण्यात आले आहे.

अनामत रक्कम जप्त झालेल्यांकडून आज नाही तर उद्या वसुली करता येईल

परंतु ज्यांचे स्वस्त धान्य परवाने रद्दच झाले आहे अश्यांकडूश कशी वसुली करणार ?

जे दुकानदार रक्कम भरण्यासाठी टाळाटाळ करत आहेत अश्या दुकानदारांवर अन्नधान्य वितरण अधिकारी फौजदारी गुन्हे दाखल करणार का ?

असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

आता हि माहिती प्रसारित झाल्यावर किती तत्परतेने वसुली केली जाणार याकडे लक्ष टिकून राहणार आहे.

याबाबतीत अधिक माहितीसाठी अन्नधान्य वितरण अधिकारी अस्मिता मोरे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

वसुली बाकी असलेले परिमंडळ
ल” परिमंडळ विभागातील ५ दुकाने, ह” परिमंडळ विभागातील १, ब” परिमंडळ विभागातील ३, ग” परिमंडळ विभागातील १, ड” परिमंडळ विभागातील ४, फ” परिमंडळ विभागातील १, ई” परिमंडळ विभागातील २०, अशी परिमंडळ विभागातील आकडेवारी आहे.

वाचा : सार्वजनिक ठिकाणी खेळत असलेल्या अवैध मटका-जुगार धंद्यावर पोलिसांचा छापा,

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular