Muslim reservation issue : जनता संघर्ष दलाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” थाळी बजाओ आंदोलन”
Muslim reservation in maharashtra
सजग नागरिक टाइम्स : हिवाळी अधिवेशनामध्ये शैक्षणिक क्षेत्रात मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण मिळण्याकरिता
जनता संघर्ष दलाच्यावतीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ” थाळी बजाओ आंदोलन “ करण्यात आले .
यावेळी पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले .
या आंदोलनात जनता संघर्ष दलाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला , शिक्षण हक्क मंचाचे अध्यक्ष मतीन मुजावर , जनशक्ती विकास संघाचे अध्यक्ष असिफसोफी खान ,
बहुजन मोर्चाचे पुणे शहराध्यक्ष गणेश भोसले , जनता संघर्ष दलाचे पुणे शहर अध्यक्ष शंकर पोटे , जनता संघर्ष दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष चांदभाई बलबट्टी ,
जनता संघर्ष दलाचे महिलाध्यक्षा रशिदा शेख , शबाना खान , फरीदा मेमन , आयमान शेख , जावेद खान , सईद शेख , आदी मान्यवर उपस्थित होते .
Muslim reservation andolan in pune
यावेळी जनता संघर्ष दलाचे संस्थापक अध्यक्ष फिरोज मुल्ला यांनी सांगितले कि ,
मंडल आयोगाने सुध्दा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळाले पाहिजे असे सांगितले आहे .
आर्टिकल १६/४ प्रमाणे आरक्षण दिले पाहिजे , म्हणून राज्य सरकारने त्वरित अंलबजावणी करावी .
कारण मुस्लिमांना ५ टक्के आरक्षण संविधानाच्या चौकटीत बसत आहे असे कोर्टाने सांगितले आहे .
मुस्लिम समाज या भारत देशाचा घटक आहे . असे बोलावे लागत आहे हे दुर्दैव आहे .
इतर बातमी : मुस्लिम समाज मूक मोर्चाच्या तयारीत
मुस्लिम समाजाला ५ टक्के आरक्षण देऊन आर्थिक दुर्बल घटकाला बरोबर घेऊन सक्षम करावे व महाराष्ट्र व देशाची प्रगती करावी .
नव्या राज्य सरकारने त्वरित बिल पारित करावे . न्यायालयाच्या आदेशाची सभागृहात चर्चा व्हावी .
तसे न झाल्यास अधिवेशन संपताच सरकार विरोधात न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे फिरोज मुल्ला म्हणाले.