गुंड शाहबाज शेख टोळीतील चौघा जणांनवर मोकका(mokka) अंतर्गत खडक पोलीस स्टेशनने कारवाई केली .
सनाटा प्रतिनिधी : पुणे शहरातील वाढत असलेल्या गुंडगिरीला आळा घालण्यासाठी खडक पोलीसांनी मोठी फिलडिंगच लावली आहे
गेल्याच आठवड्यात घोरपडे पेठेतील 4 गुन्हेगारांवर (mokka) मोकका अंतर्गत कारवाई केली होती .
तर आता कारवाईचे सत्र सुरू करून भवानी पेठ काशिवाडी येथील तीन गुंडावर मोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे ,
खडक पोलीस स्टेशन च्या हद्दीत शाहबाज मुखतार शेख याने स्वताची टोळी स्थापन करून व काहि साथिदारांना सोबत घेऊन नागरिकांनमध्ये दहशत निर्माण केली होती,
शाहबाज मुखतार शेखवर गंभीर दुखापत करणे, दहशत निर्माण करणे,जबरी चोरी, घरफोडी, व ईतर मोठ्या स्वरूपाचे गुन्हे दाखल होते.
त्याला वर्षभरा करीता तडीपार हि करण्यात आले होते परंतु तो काहि सुधरत नसल्याने कायदा सुव्यवस्था प्रश्न उधभवू नये
यासाठी आरोपी 1)शहबाज मुखतार शेख, (रा. कासेवाडी भवानी पेठ) 2) योगेश मारूती गायकवाड (रा, कासेवाडी भवानी पेठ),
3) अजय उर्फ बटल्या संतोष कांबळे, 4) राहुल गणेश नेटके, (रा. कासेवाडी भवानी पेठ पुणे)
या चौघांवर महाराष्ट्र संघटित गुन्हे गारी नियंत्रण कायदा नुसार मोकका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे
डाॅ बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजेन्द्र मोकाशी व संभाजी शिरके ( गुन्हे) व सहाय्यक पोलीस निरिक्षक जे सी मुजावर,
पोलीस उप निरिक्षक आनंत व्यवहारे संजय गायकवाड, पोलीस कर्मचारी सर्फराज शेख, महेश बारवकर, महेश कांबळे, अनिकेत बाबर,राहुल जोशी यांनी मिळून हि कारवाई केली.