दहशत निर्माण करण्यासाठी धारदार शस्त्रासह बनावट पिस्तल बाळगणाऱ्या सराईत गुंडास अटक(police Arrest a gangster)
police Arrest a gangster :पुणे :दिनांक 17 ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस आयुक्त मालोजीराव पाटील,
स्वारगेट विभाग, यांच्या दीमतीत भारती विद्यापीठ तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुबराव लाड,
व पोलिस नाइक सरफराज देशमुख, व सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयाकडील पोलीस हवालदार डी. सी बारभाई,
पोलीस हवालदार एस .ए.रसाळे ,पोलीस हवालदार पगारे, पोलीस हवालदार आर.जी. बारबोले, पोलीस नाईक एस. ए.बारटक्के, पोलीस शिपाई ए. ए.गोपने ,
पोलीस शिपाई एस.एस.दिवटे यांच्या सह सरकारी वाहनातून व खाजगी मोटरसायकलवरून भारती विद्यापीठ पोलीस ठाणे हद्दीत
आगामी दहीहंडी व गणपती उत्सवाचे अनुषंगाने सुरक्षिततेच्या दृष्टीने लॉज चेकिंग करताना पुणे ते सातारा हाइवे रोडने गंधर्व लॉन्स समोरून जात असताना,
सच्चाई माता अंजली नगरकडून येणाऱ्या रोड वरून फॅशन मोटरसायकलवर काळे रंगाचा टी-शर्ट व लाल रंगाचे जर्किन घातलेल्या
इसमाचा पोलीस नाईक सर्फराज देशमुख यांना संशय आल्याने त्याचा पाठलागकरुन त्यांना पकडले,
हेपण वाचा : हायप्रोफाईल मसाज पार्लरवर पोलिसांचा छापा
त्यांना त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांची नावे व पत्ते १) आदित्य विनोद नाईक वय एकोणीस वर्षे हनुमान नगर दुर्गा माता मंदिराच्या जवळ जांभुळवाडी रोड आंबेगाव खुर्द पुणे
२)सागर हनुमंत अहिवाले वय वीस -जांभुळवाडी रोड शनी मंदिर जवळ आंबेगाव खुर्द पुणे, असे सांगितले
त्यावेळी त्यांच्याकडे काहीतरी संशयित वस्तु असल्याचा संशय आल्याने स्टाफच्या मदतीने त्याची अंगझडती घेतली असता
आदित्य विनोद नाईकच्या कमरेला खोचलेला एक लोखंडी कोयता व एक बनावट पिस्तल मिळून आले
तसेच सागर हनुमंत अहिवाले त्यांच्या कमरेला खोचलेला एक लोखंडी धारदार कोयता मिळून आला,
त्यांच्याकडे मिळून आलेल्या हत्त्याराबाबत अधिक चौकशी केली असता त्यांनी त्यांचा विरोधक अमित शिर्के यांच्याबरोबर पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून
दहीहंडी व गणपती उत्सवा दरम्यान संधी मिळेल त्या वेळेस त्याला मारण्याच्या उद्देशाने हत्यारे स्वतःजवळ बाळगल्याचे सांगितले.
हेपण वाचा : येरवडा जेलमध्ये नेताना पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जाणाऱ्याला खडक पोलीसांनी केले अटक
सदरची कारवाई श्रीकांत तरवडे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, सरदेशपांडे पोलिस उपायुक्त परिमंडळ 2, पुणे शहर,
मालोजीराव पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग पुणे, यांच्या मार्गदर्शनाखाली विष्णू ताम्हाणे पोलीस निरीक्षक (गुन्हे)
व तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरीक्षक सुबराव लाड व भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन तपास पथकातील कर्मचारी व
सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यालयातील कर्मचारी यांनी मिळून संयुक्त कारवाई केलेली आहे.
हेपण वाचा : वानवडी वाहतूक पोलिसांनी जीवावर खेळून जप्त केले हत्यार व वाहन