HomePolice Newsबकरी ईद व आषाढी एकादशी निमीत्त कोंढव्यात पोलिसांचा रूट मार्च

बकरी ईद व आषाढी एकादशी निमीत्त कोंढव्यात पोलिसांचा रूट मार्च

Bakri Eid and Ashadhi Ekadashi

सजग नागरिक टाइम्स: पुणे: २९ जून २०२३ – मध्ये बकरीईद व आषाढी एकादशी धार्मीक सण येत आहेत. सदर सणाच्या अनुषंगाने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन रितेशकुमार पोलीस आयुक्त, संदिप कर्णिक , सह पोलीस आयुक्त, रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग, यांचे आदेश व मार्गदर्शनानुसार श्री शंभुराजे साळवे, सहाय्यक पोलीस आयुक्त वानवडी विभाग यांचेसह संतोष सोनवणे,

वरिष्ठ पोलीस निरीक्षक, व संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) व कोंढवा पोलीस ठाणे कडील ६ अधिकारी, ३० कर्मचारी, आर. सी.पी. ५, कोंढवा बीट मार्शल, सी. आर. मोबाईल, यांच्यासह कोंढवा पोलीस ठाणे हद्दीत कोंढवा पोलीस ठाणे आर्शिवाद चौक सत्यानंद हॉस्पिटल •

कोर्णाक पुरम सोसायटी – बादशाह नगर सोसायटी भैरवनाथ मंदिर – – भिमनगर वसाहत नरविर तानाजी मालुसुरे चौक – (ज्योती हॉटेल चौक) या परिसरात रुट मार्च घेण्यात आला.

तसेच सदर रुट मार्च दरम्यान नागरीकांना कोणत्याही अफवावंर विश्वास ठेवु नये. अगामी सण मध्ये कुठलेही जातीय तेढ निर्माण होवु देवु नये तसेच पोलीस मदतीसाठी ११२ या नंबर कॉल करावा अशा सुचना देण्यात आल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular