सजग नागरिक टाइम्स: पुणे :(Fejane Madina Masjid ) 23 जून रोजी कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत फेजाने मदिना मस्जिद, साईबाबा नगर, कोंढवा खुर्द, पुणे या ठिकाणी कोंढवा पोलीस स्टेशनच्या वतीने अमली पदार्थ विरोधी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
सदर कार्यक्रमात मदरसा मधील मुलांना धूम्रपान व कुठलेही प्रकारचे व्यसन करू नये ते केल्यास शरीरास किती धोका आहे याबाबत सांगण्यात आले.
तसेच आपण आपल्या घरातील लोकांना तसेच मित्रमंडळी यांना व्यसनाधीन न होता व्यसनमुक्तीकडे वळवण्याचा प्रयत्न करावा असे सांगावे.
हेपण वाचा : धर्माच्या भिंती ओलांडून वारकऱ्यांची मालिश करणाऱ्या मुस्लिम सेवकाची सर्वत्र चर्चा.
सदर कार्यक्रमासाठी मौलाना सुफी अन्वर व त्यांच्या मदरसा मधील 35 ते 40 मुलं, पोलीस स्टेशन कडे गोपनीय व एटीसी स्टाफ असे उपस्थित होते.
सदर कार्यक्रम सायंकाळी 8.15 वाजता सुरू होऊन 9.00 वाजता शांततेत पार पडला.संजय मोगले पोलीस निरीक्षक (गुन्हे) कोंढवा पोलीस स्टेशन पुणे शहर यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.