Homeताज्या घडामोडीभवानी पेठेतील सोनवणे हॉस्पिटल मधील दोन डॉक्टरांसह काही नर्स क्वारंटाईन..!

भवानी पेठेतील सोनवणे हॉस्पिटल मधील दोन डॉक्टरांसह काही नर्स क्वारंटाईन..!

Doctors and nurses quarantine : सोनवणे प्रसूतिगृहामध्ये उपचारांसाठी दाखल झालेली महिला निघाली कोरोना रुग्ण

doctors-and-nurses-quarantine at Sonawane Hospital in Bhavani Peth

Doctors and nurses quarantine :सजग नागरिक टाईम्स : पुणे महापालिकेच्या सोनवणे प्रसूतिगृहामध्ये उपचारांसाठी दाखल झालेल्या

गरोदर महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचे समोर आल्यानंतर तिच्यावर उपचार करणा-या दोन डॉक्टरसह पाच ते सहा नर्सना विलगीकरण करून ठेवण्यात आले आहे.

रुग्णालयात खबरदारी बाळगण्यात येत आहे.शहरात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. दररोज रुग्ण संख्या वाढत चालली आहे.

आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा ३० पेक्षा अधिक झाला आहे. पालिकेकडून सर्वेक्षण, तपासण्या, विलगिकरण,

जनजागृती, प्रत्यक्ष उपचार आदी उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील मध्यवस्तीसह आणखी २२ ठिकाणे सील करण्यात आली आहेत.

कोरोनाचा सामाजिक संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. सोनवणे रुग्णालयात दाखल झालेली महिला गरोदर होती.

कोरोनामुळे पुण्यातील आणखी 22 ठिकाणे होणार सील..

तिला ताप आणि अशक्तपणा असल्याने डॉक्टरांनी तिच्या घशातील द्रावाचे नमुने तपासणीकरिता पाठविले होते.

या तपासणीचा वैद्यकीय अहवाल सोमवारी पाॅझिटिव्ह आला. या महिलेला कोरोना संक्रमण झाल्याचे निष्पन्न होताच उपचारांसाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेमुळे सोनवणे रुग्णालयात खळबळ उडाली आहे. या महिलेवर उपचार करीत असलेल्या दोन डॉक्टर आणि सहा नर्सचे विलगिकरण करण्यात आलेआहे.

पालिकेच्या सोनवणे रुग्णालयातील कर्मचारी आणि डॉक्टरांना खबरदारी घेण्याच्या आणि आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

विलगिकरण करण्यात आलेल्या वैद्यकीय कर्मचा-या व्यतिरिक्त अन्य कर्मचा-र्यांनावरही लक्ष ठेवण्यात येत आहे.

VIDEO: Pune| Bhavani Peth मध्ये सर्वाधिक मृत्यू | भवानी पेठेत Corona मुळे 11 जणांचा मृत्यू.

Share Now
RELATED ARTICLES
- Advertisment -spot_img

Most Popular