सनाटा न्यूजचे संपादकाच्या परिवारावर हल्ला करणारे अद्याप फरार

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFER
Advertisement

मजहर खानच्या परिवारावर हल्ला करणारे अद्याप(wanwadi police station news)

wanwadi police station-Those who attacked Mazhar Khan's family are still absconding

wanwadi police station news:वानवडी पोलिसांनी तक्रार घेण्यास लावले ३७ तास.सदरील प्रकरणाची प्रेस नोट काढण्यास पोलिसांनी टाळून गुन्हेगारांना दिली साथ. 

सनाटा प्रतिनिधी ; पुणे शहरातील वानवडी पोलिसांचे गुन्हेगारांना मोकळे रान, वानवडी पोलीस स्टेशन याच्या टाईमपास भुमिकेमुळे गुन्हेगार पसार.

मंगळवार दिनांक ५ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ ते ८ च्या दरम्यान सय्यदनगर गल्ली नं १२ अ मध्ये लहान मुले खेळता खेळता डीओ या मोटर सायकलवर बसले होती.

सबंधित गाडीचा मालक याने येऊन रकीब मजहर खान वय १३ वर्षे व अयान अन्वर पठाण वय १३ वर्षे

Advertisement

रा.हडपसर सय्यद नगर गल्ली नं १२ या दोघाना हातातील पाईपने मारहाण करून गंभीर दुखापत केली.

हि दोन्ही मुले रडत रडत घरी आली या प्रकारचा जाब विचारण्यासाठी सनाटाचे कार्यकारी संपादक अजहर खान

व त्यांची पत्नी गेले असता सदरील गुन्हेगार फिरोज शेख याने अजहर खान

यांना ढकलून त्यांच्या पत्नी च्या छातीवर लात मारून त्याना जखमी केले.

Advertisement

व त्याच्या सोबत असलेले त्याच्या घरच्यांनीहि या दोघांवर हल्ला चढवून जखमी केले.

या घडलेल्या प्रकारची तक्रार करण्यासाठी खान परिवार पोलीस चौकीत गेले असता चौकी रिकामी होती.

याबाबत खान यांनी १०० नंबर वर फोनकरून तक्रार नोंदवली असल्याने या परिसरात पोलीस येण्यापूर्वी

सदरील परिसरातील इतर गुन्ह्यात फरार असलेला आरोपी अंत्या हा गल्लीत उभे असलेल्या फिरयादिच्या ननदेस

Advertisement

शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देऊन अंगावर धावून आला व फिर्यादीच्या ननदेची गचंडी धरली.

हेपण वाचा ; विनयभंगाच्या गुन्ह्यांत चोवीस तासांत आरोपपत्र दाखल करण्याचे आदेश

सदरील प्रकार हे खान यांना कळाल्यानंतर सर्वजण चौकीतून परत घराजवळ आले तो पर्यंत आरोपी हे फरार झाले.

Advertisement

१०० नंबरला फोन केल्यानतर सदरील परिसरात पोलीस आले पण तो पर्यंत आरोपी हे फरार झाले होते.

Advertisement

या संपूर्ण प्रकारची लेखी तक्रार घेण्यास रात्रीचे १.३० वाजले पण तक्रार रजिस्टर करण्यास बहाणे चालू झाले.

दुसर्या दिवशी परत रात्रीचे ९ वाजवले पण तक्रार नोंदणीस टाईमपास करून तक्रार माघे घेण्याची वाट पाहू लागले जेणे करून  काम वाचवण्याचेच काम चालू होते.

अखेर ३७ तासानंतर मारहाण व विनयभंगाची तक्रार दाखल करण्यात आली असून सदरील आरोपी हे फरार आहे.

सदरील प्रकरणाची प्रेस नोट काढण्यास पोलिसांनी टाळून गुन्हेगारांना साथ दिली.

Advertisement

या भूमिकेमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे?

पोलिसांच्या या भुमिके मुळेच तेथील नागरिक या गुन्हेगाराविरोधात तक्रार देण्यास मागे पुढे करत असल्याचेच अनेक नागरिकांनी सांगितले.

सदरील गुन्हेगार हे मस्जिद व दर्गाहच्या जवळ उभे राहून गांजा विक्रीचा धंदा करत असून

ये जा करणार्या महिलांना यांच्या छेडखाणीला व त्रासाला दररोज सामोरे जावे लागत आहे.

Advertisement

पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला हे या परिसरातील नागरिकांना या गंजडी

गुन्हेगारापासून वाचवण्यासाठी काय उपाय करतील यावर नागरिकांचे लक्ष लागून आहे.

सय्यदनगर येथील मुलीची छेड काढणारा आरोपी अजूनही पसारच

Advertisement

One thought on “सनाटा न्यूजचे संपादकाच्या परिवारावर हल्ला करणारे अद्याप फरार

Leave a Reply

कमी गुंतवणुकीत आजच आपले News Portal बनवा व पैसे कमवा

न्यूज वेबसाईट एका दिवसात बनवून मिळेल