सजग नागरिक टाइम्स: पुणे शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या खडक पोलीस ठाण्याने एक आगळावेगळा उपक्रम राबविला आहे .पोलीस ठाण्याच्या आवारातच हँगिंग गार्डन बनवले आहे, तसेच ठाणे अंमलदारासाठी कक्ष स्थापन केले आहे.
या कक्षा मुळे नागरिकांना व पोलिसांना मदत मिळणार आहे. सदरील कक्षाचे उद्घाटन पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमाला संदीप कर्णिक पोलीस सह आयुक्त पुणे शहर, राजेंद्र डहाळे अप्पर पोलीस आयुक्त पश्चिम विभाग पुणे शहर,संदीप सिंह गिल्ल पोलीस उपायुक्त झोन 2 , सतीश गोवेकर सहाय्यक पोलीस आयुक्त फरासखाना विभाग , श्रीमती संगीता यादव वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक पोलीस स्टेशन,
राजेश तटकरे पोलीस निरीक्षक गुन्हे खडक पोलीस स्टेशन पुणे व खडक पोलीस स्टेशन मधील अधिकारी व अंमलदार व कर्मचारी उपस्थित होते. या वेळी पोलीस आयुक्तांनी खडक पोलीस स्टेशन मध्ये तयार करण्यात आलेल्या हँगिंग गार्डन चे ही कौतुक केले.