ताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूज

भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालया तर्फे अतिक्रमण कारवाई जोमात

Advertisement

Sajag Nagrikk Times : (Atikraman action) भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत अनेक ठिकाणी अतिक्रमण करण्यात आले होते .याची माहिती मिळताच अतिक्रमण विभागाच्या वतीने अनेक ठिकाणी कारवाई करून सदरील अतिक्रमण हटविण्यात आले .

भवानीपेठेतील बाहुबली चौक येथील कोटक बँकेसमोर अनधिकृत रित्या उभे केलेले टायर चे खोके काढण्यात आले ,तसेच एकाने फुटपाथवर ताबा मारून पत्राचे शेड मारले होते तेही काढण्यात आले.

Advertisement

भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत कसबा मतदारसंघ येत असल्याने येथे आमदारकीची पोटनिवडणूक चालू असून याप्रभागात आचारसंहिता लागू असल्याने घोरपडे पेठेत अनेक ठिकाणी राजकीय लोकांचे फ्लेक्स बॅनर लागलेले होते

त्यावरही अतिक्रमण विभाग व आकाशचिन्ह विभागामार्फत कारवाई करून फ्लेक्स व बॅनर काढण्यात आले.सदरील कारवाई ही अतिक्रमण निरीक्षक लोंढे ,निरीक्षक घोलप ,निरीक्षक साबळे,निरीक्षक प्रतिक निघूट यांच्या सहित 6 बिगारी यांच्या पथकाने 1 जेसीबी ,1 ट्रक यांच्या सहाय्याने केली.

Share Now