ताज्या घडामोडी

हडपसर सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे ४०℅ अनुदान पुणे महानगर पालिकेने केले स्थगित

Advertisement

५ वी ते ७ वी तुकड्यांना मान्यता नसल्याची धक्कादायक माहिती आली समोर.

संचालक मंडळावर गुन्हा दाखल करण्याची मागणी.

सजग नागरिक टाइम्स :प्रतिनिधी.पुणे हडपसर सय्यदनगर मधील वारंवार चर्चेत येणाऱ्या आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या शाळेचा अनागोंदी कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

काही ना काही कारणाने व शासनाची फसवणूक केल्याची प्रकरणे समोर येत असल्याने ट्रस्टच्या गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सय्यदनगर मधील आयडियल एज्युकेशन ट्रस्ट संचालित समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेची ५ वी ते ७ वी तुकडी मान्यता नसल्याची तक्रार अजहर अहमद खान यांनी केली होती.

त्याची दखल पुणे महानगर पालिका शिक्षण विभागाकडून घेतली जात नसल्याने खान यांनी मंत्रालय गाठून चौकशी मागणी केली होती.

दरम्यान सदरील समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेने २०℅ अनुदानावरुन ४०% अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. तेवढ्यात मंत्रालयातून खान यांची त्या तक्रारीची दखल घेत चौकशी करण्याचे आदेश पारित झाले होते.

त्यानंतर २० मार्च २०२३ रोजी पडताळणी प्रस्ताव सादर करण्यात आला. व प्रशासकीय अधिकारी शिक्षण विभाग ( प्राथमिक) पुणे महानगर पालिका मिनाक्षी राऊत यांनी २८ जून २०२३ रोजी इयत्ता ५ वीच्या वर्गास शासन मान्यता नाही.

तसेच इयत्ता ६ वी, ७ वी नैसर्गिक वाढ विभागीय शिक्षण उपसंचालक यांची मान्यता नाही.

Advertisement

सबब इयत्ता ५ वी ते ७ वी प्रथम वर्ग अमान्य. तर इयत्ता १ ली ते ४ थी प्रथम वर्गावरील शिक्षकांचे शालार्थ आयडी नसल्याने सद्यस्थितीत २०℅ वरून ४०% टक्के अनुदानासाठी स्थगित. असे अश्याचे पत्र काढले आहे.

परंतु खान यांना सदरील माहिती, माहिती अधिकारात देण्यास टाळाटाळ केली जात होती. माहिती विहित मुदतीत न दिल्याने अजहर खान यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार घेण्याचा निर्णय घेतल्याने व त्याची कुणकुण शिक्षण विभागात लागल्याने अखेर शिक्षण विभागातील माहिती लपविणाऱ्यांनी माहिती दिल्याने सदरील प्रकार समोर आला आहे.

शिक्षण विभाग काढतोय झोपा? संचालक मंडळावर आणि मुख्याध्यापकावर गुन्हा दाखल करा.

सदरील समता प्राथमिक विद्यामंदिर शाळेच्या ५ वी ते ७ वी तुकडयांना शासन मान्यता नसल्याचे उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने या ५ महिन्यात ५ वी ते ७ वी शाळा बंद न पाडल्याने, आजरोजी बिनधास्तपणे संचालक मंडळ व मुख्याध्यापक ५ वी ते ७ वी ची शाळा भरून विदयार्थी व त्यांच्या पालकांची फसवणूक करत आहे.

जसे काही दिवसांपूर्वी आर्यन शाळा बेकायदेशीर असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता.तसाच गुन्हा आता शिक्षण विभागाने आयडियल एज्युकेशन ट्रस्टच्या संचालक मंडळावर आणि मुख्याध्यापकावर तातडीने गुन्हा दाखल करावा आणि वेळ न दडवता व कागदी घोडे न नाचविता थेट कारवाई करावी अशी मागणी अजहर खान यांनी केली आहे.

Share Now