ताज्या घडामोडीपुणे

छोटा शेख सल्ला दर्गा परिसरात महापालिकेकडून कारवाईची शहरात अफवा पसरविणाऱ्या १७ जणांविरुद्ध गुन्हा

Advertisement

पुणे : कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गा परिसरात महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याची अफवा समाजमाध्यमातून प्रसारित केल्याप्रकरणी पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

याप्रकरणी फरासखाना १ आणि मुंढवा पोलिस ठाण्यात १६ जणांवर असे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कसबा पेठेतील छोटा शेख सल्ला दर्गाह परिसरात महापालिकेकडून कारवाई करण्यात येत असल्याचा दिशाभूल करणारा संदेश समाजमाध्यमात प्रसारित करण्यात आला होता.

Advertisement

या संदेशामुळे तणाव निर्माण झाला. समाजमाध्यमातील खात्यातून संदेश प्रसारित केल्याचे आढळून आल्यानंतर पोलिसांनी १७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

समाजमाध्यमात खोटा संदेश प्रसारित करणे, तसेच अफवा पसरविल्याप्रकरणी पोलिसांनी आजमितीला ५१ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

Share Now