लोकसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पोलीस आयुक्त पुणे शहर यांनी पुणे शहरातील बड्या गुन्हेगारांची परेड घेऊन यापूर्वी अग्नीशस्त्रे बाळगणाऱ्यांची देखील हजेरी पोलीस आयुक्त कार्यालयात लावली होती.
अशातच येरवडा पोलीसांनी एका सराईताकडून देशी बनावटीचे दोन पिस्टल व चार राऊंड हस्तगत केले. अभिषेक नारायण खोंड, वय २३ वर्षे, राहणार लोहगाव रोड, वाघोली पुणे असे सराईताचे नाव आहे. त्याच्यावर यापूर्वी येरवडा पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल असून मोक्याच्या गुन्हयात येरवडा कारागृहात होता.
सहा महिन्यापूर्वी येरवडा कारागृहातून बाहेर आला होता.पोलीस कस्टडीमध्ये तपासादरम्यान त्याकडून आणखी एक पिस्टल व २ राऊंड हस्तगत करण्यात आले आहे असे आरोपीकडून एकूण ६५,५०० रुपये किंमतीचे एकूण २ पिस्टल व ४ राऊंड हस्तगत करण्यात आले आहेत.
सदरची कामगिरी संतोष पाटिल पोलिस निरिक्षक येरवडा, राहुल जगदाळे, पोलिस निरिक्षक गुन्हे, येरवडा यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलिस उपनिरिक्षक स्वप्निल पाटील, श्रेणी पोलिस उपनिरिक्षक प्रदिप सुर्वे, पोलिस हवालदार गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, किरण घुटे, कैलास डुकरे, पोना सागर जगदाळे, पोअंमलदार अनिल शिंदे, सुरज ओंबासे, दत्तात्रय शिंदे, प्रशांत कांबळे, सुशांत भोसले, विठ्ठल घुले, नटराज सुतार यांनी केलेली आहे.