बाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,

sajag-advertisement-offerWEB HOSTING OFFERgolden night sex power suplimentlow-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement

Babri Masjid demolition case:सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

Babri Masjid demolition case : सजग नागरिक टाइम्स

babri-masjid-demolition-case-acquittal-of-all-accused

बाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी आज सीबीआयचे विशेष न्यायाधीशांनी लखनऊतील विशेष न्यायालयात आपला निर्णय दिला.

यावेळी साध्वी ऋतंभरा यांच्यासहित 18 आरोपी कोर्टात उपस्थित होते.

तर लालकृष्ण अडवाणी यांच्यासह काही व्हिडीओ कॉन्फर न्सिंगच्या माध्यमातून उपस्थित होते.

Advertisement

कोर्टात यावेळी तब्बल 2000 पानांचा निकाल वाचण्यात आला.

न्यायालयाने या वेळी सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत, हा पूर्वनियोजित कट नसल्याचे जाहीर केले .

न्यायालयाच्या या निर्णयामुळे भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, उमा भारती

मुरली मनोहर जोशी यांचीही निर्दोष मुक्तता झाली आहे.

याआधी सेशन ट्रायल क्रमांक 344/1994, 423/2017 आणि 726 / 2019 सरकार विरुद्ध पवन कुमार पांडे,

Advertisement

आणि वरील प्रकरणातील सर्व सुनावणी 16 सप्टेंबर रोजी संपली होती.

त्यानंतर सुरेंद्र कुमार यादव, पीठासीन अधिकारी, विशेष न्यायालय,

अयोध्या केस लखनऊ यांनी 30 सप्टेंबर 2020 रोजी निर्णय देण्याची तारीख निश्चित केली.

बाबरी मस्जिद विध्वंस प्रकरणात एकूण 49 आरोपी होते,

त्यापैकी सध्या 32 जिवंत आहेत आणि 17 जणांचा मृत्यू झाला आहे.

Advertisement

या खटल्यात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी या दिग्गजांची नावे आरोपी म्हणून होती.

मुरली मनोहर जोशी, लालकृष्ण अडवाणी, उमा भारती, कल्याण सिंह,विनय कटियार,

महंत नृत्य गोपाल दास,साध्वी ऋतंभरा, महंत धर्मदास, डॉ. राम विलास वेदांती,लल्लू सिंह, प्रकाश शर्मा, चंपत राय,

सतीश प्रधान, पवन कुमार पांडे, विजय बहादुरसिंग, संतोष दुबे, गांधी यादव, कमलेश त्रिपाठी, रामचंद्र खत्री,

Advertisement

जय भगवान गोयल,रामजी गुप्ता, ब्रजभूषण शरण सिंह, ओम प्रकाश पांडे, अमर नाथ गोयल,

महाराज स्वामीसाक्षी,जयभानसिंग पवईया, विनय कुमार राय,आचार्य धर्मेंद्र देव, नवीन भाई शुक्ला ,

आरएन श्रीवास्तव, सुधीरकुमार कक्कर आणि धर्मेंद्रसिंग गुर्जर.

सीबीआयने जाहीर केलेल्या 49 आरोपींपैकी 17 जणांचे निधन झाले आहे.

यात अशोक सिंघल,विष्णू हरी डालमिया, गिरीराज किशोर, महामंडलेश्वर जगदीश मुनि महाराज,

Advertisement

मोरेश्वर सवाईन, महंत अविद्यानाथ,डॉ सतीश. नगर, बाळासाहेब ठाकरे, बैकुंठ लाल शर्मा,

परमहंस रामचंद्र दास, तत्कालीन एसएसपी डीबी राय, रमेश प्रताप सिंह, महात्यागी हरगोविंद सिंह,

राम नारायण दास आणि विनोद कुमार बन्सल .लक्ष्मी नारायण दास, यांचे निधन झाले आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर सुनावणी वेगाने सुरू झाली

low-cost-news-portal-design-4999-rs
Advertisement
Advertisement

9 एप्रिल 2017 रोजी या खटल्याचा निकाल देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने 31 ऑगस्टची डेडलाईन दिली होती.

त्यास नंतर एक महिन्याने वाढवण्यात आले होते.

हे काम वेळेत व्हावे यासाठी विशेष न्यायालयाने रोज सुनावणी घेतली होती.

21 मे 2017 रोजी, विशेष सीबीआय कोर्टाने सर्वोच्च न्यायालयीन आदेशानुसार रोज अयोध्या प्रकरणात सुनावणी सुरू केली.

Advertisement

8 मे 2020 रोजी सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी 3 महिन्यांत पूर्ण करावी आणि 31 ऑगस्ट 2020 ची तारीख निश्चित करावी, असे निर्देश दिले होते.

मात्र लॉकडाऊनमुळे सुप्रीम कोर्टाने 30 सप्टेंबर रोजी खटला संपविण्याचा निर्णय घेतला.

6 डिसेंबर 1992 रोजी नेमकं काय घडलं?

अयोध्येत 6 डिसेंबर 1992 लाखोंच्या संख्येने हिंदू कार सेवकांनी बाबरी मस्जीदचा घुमट पाडला.

त्यावेळी उत्तर प्रदेशात कल्याण सिंह यांचं सरकार होतं, जे सध्या राजस्थानचे राज्यपाल आहेत.

Advertisement

देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवक अयोध्येत दाखल झाले होते.

यांमध्ये विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांचा समावेश होता.

सकाळी साडे दहा वाजता हजारो कारसेवकांनी बाबरी मस्जीदला वेढा घातला आणि घुमटापर्यंत पोहोचले.

त्यावेळी प्रत्येकाच्या मुखात ‘जय श्री राम’चा नारा होता.

अयोध्येतील वादग्रस्त वास्तूपर्यंत पोहचलेला जमाव नियंत्रणाबाहेर गेला होता.

Advertisement

वादग्रस्त वास्तूजवळ जवळपास दीड लाख कारसेवक जमा झाले होते.

त्यामुळे वास्तूच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला. त्यावेळी अयोध्येतील परिस्थिती भयंकर झाली होती.

कल्याण सिंह यांनी गोळी न चालवण्याचे आदेश दिले होते.

यावेळी कारसेवकांवर कुणीही गोळी चालवणार नाही असे आदेश मुख्यमंत्री कल्याण सिंह यांनी दिले होते.

Advertisement

त्यावेळी अयोध्येत येणारे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी 10 हजार पोलीस तैनातकरण्यात आले होते.

दुपारी 3 वाजून 40 मिनिटांनी पहिला घुमट तोडण्यात आला.

4.55 वाजता संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करून . कारसेवकांनी त्याच जागी पूजा करून रामलल्लाची स्थापना केली.

Advertisement
Share Now

One thought on “बाबरी मस्जीद विध्वंस प्रकरणी कोर्टाचा मोठा निर्णय,

Comments are closed.